जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा 45 हजार पार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 10 एप्रिलला कोरोनाने 3 बळी घेतले असून, उपचारादरम्यान चिखली येथील 60 वर्षीय पुरुष, पहुरजिरा (ता. शेगाव) येथील 72 वर्षीय पुरुष व निंभोरा (ता. खामगाव) येथील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात नव्या 845 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, 819 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 10 एप्रिलला कोरोनाने 3 बळी घेतले असून, उपचारादरम्यान चिखली येथील 60 वर्षीय पुरुष, पहुरजिरा (ता. शेगाव) येथील 72 वर्षीय पुरुष व निंभोरा (ता. खामगाव) येथील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात नव्‍या 845 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर पडली असून, 819 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. एकूण बाधितांचा आकडा 45 हजार पार गेला असून, सध्या रुग्‍णालयात 5768 रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5740 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4895 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 845 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 471 व रॅपिड टेस्टमधील 374 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 990 तर रॅपिड टेस्टमधील 3905 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 184, बुलडाणा तालुका : म्हसला 9, येळगाव 2, बोरखेडी 2, जाब 1,सोयगाव 1, पांगरी 2, गिरडा 2, पाडळी 1, मढ 1, अंभोडा 2, बोदेगाव 1, सिंदखेड 1, माळवंडी 6, शिरपूर 3, तांदुळवाडी 2, नांद्राकोळी 1, देऊळघाट 5, मासरूळ 4, डोंगरखंडाळा 1, धाड 4, टाकळी 3, करडी 2, हतेडी 2, सागवन 2, मातला 1, सावळा 2, चांडोळ 1, झरी 2, मोताळा तालुका : दाभा 1, खांडवी 1, जयपूर 6, खैरखेड 1, आव्हा 1, पिंपळगाव गवळी 1, काबरखेड 1,दाभाडी 2, वाडी 2, लिहा 1, पिंपळगाव देवी 1, लपाली 1, पान्हेरा 6, धामणगाव बढे 3, किन्होळा 2, ब्राह्मंदा 1, वडगाव 1, खामगाव शहर :52, खामगाव तालुका : गोंधनापूर 1, निपाणा 1, हिंगणा 1, लांजूड 2, आमसरी 1, सुटाळा 5, मांडका 1, गारडगाव 1, घाटपुरी 2, पिंपळगाव राजा 2, शहापूर 1, वझर 2, तांदुळवाडी 2, शेगाव शहर : 20, शेगाव तालुका : आळसणा 1, टाकळी 1, मच्‍छिंद्रखेड 1, जलंब 2, पहुरजिरा 2, शिरसगाव निळे 1, चिंचोली 1, जवळा 1,नायगाव खुर्द 1, चिखली शहर : 38, चिखली तालुका : सवणा 1, अंत्री खेडेकर 1, पळसखेड 1, हातणी 1, उंद्री 2, शेलूद 2, चंदनपूर 2, किन्ही नाईक 1, पेठ 1, कोनड 1, अंचरवाडी 1, मंगरूळ नवघरे 1, चांधई 1, वैरागड 1, वाडी 1, मुरादपूर 2, ब्रह्मपुरी 1, एकलारा 1, भालगाव 3, शेलगाव जहा 2, अमोना 1,बेलगाव 1, मलकापूर शहर :57, मलकापूर तालुका : पान्हेरा 1, निंबारी 2, मोरखेड 2, उमाळी 3, लासुरा 1, घिर्णी 2, वरखेड 1, दाताळा 1, हरणखेड 1, चिंचखेड 1, दसरखेड 2, देऊळगाव राजा शहर :30 ,देऊळगाव राजा तालुका : देऊळगाव मही 6, सिनगाव जहा 2, चिंचखेड 5, खैरव 2, धोत्रा नंदई 1, मेंडगाव 2, अंढेरा 5, गारखेडा 1,पळसखेड 1, बोरखेडी 1, गिरोली 1, आळंद 1, रूस्तद 1, गोंधनखेड 3, सिंदखेड राजा शहर :5, सिंदखेड राजा तालुका : बाळसमुद्र 1, साखरखेर्डा 4, वसंतनगर 1, गोरेगाव 1, पिंपळगाव सोनाळा 1,शेंदुर्जन 1, महारखेड 2, दत्तापूर 2, किनगाव राजा 5, निमगाव वायाळ 4, शेलगाव काकडे 1, मेहकर शहर : 52, मेहकर तालुका : शेंदला 5, साब्रा 1, दुर्गबोरी 2, अंजनी 1, कल्याणा 1, गोहेगाव 1, आरेगाव 1, जवळा 1, लोणी गवळी 1, पिंपळगाव उंडा 1, शिवपुरी 1, नागापूर 1, नांद्रा धांडे 1,शेंदला 1,लव्हाळा 1, ब्रह्मपुरी 2, सावरगाव 1, मादनी 1, परतापूर 2, बोरी 2, देऊळगाव माळी 3, हिवरा आश्रम 1, बोडखा 1,डोणगाव 1, शेलगाव 1, रामपूर 1, उकळी 2, दाभा 1, संग्रामपूर शहर : , संग्रामपूर तालुका : भोन 1, चौंढी 1, जळगाव जामोद शहर :11, जळगाव जामोद तालुका : खेर्डा 1, निंभोरा 3, भेंडवळ 2, तिवडी 1,अकोला खुर्द 1, चालठाणा 1,वडगाव पाटण 2, जामोद 1, आसलगाव 2, दादुलगाव 1, पिंपळगाव काळे 6, बोराळा खुर्द 1, नांदुरा शहर : 18, नांदुरा तालुका : रोटी 1,केदार 6, निमगाव 1, अवधा 1, आलमपूर 1, खुरकुंडी 2, पोटा 3, शेलगाव मुकुंद 3, टाकळी वतपाळ 4, लोणार शहर :14, लोणार तालुका : किनगाव जट्टू 1, बेलोरा 2, देऊळगाव वायसा 1, तांबोळा 1, बिबी 4, पिंप्री 2, सोनाटी 5, सुलतानपूर 1, पळसखेड 1,हत्ता 1, गोवर्धन 2, देऊळगाव कुंडपाळ 1, शारा 2, बोराखेडी 1, देवानगर 1, महारचिकना 1, पिंपळनेर 1, करणवाडी 2, ब्राह्मण चिकना 1, देऊळगाव 1, चोरपांग्रा 2, मांडवा 2, परजिल्हा भोकरदन 2, बाळापूर 1, शेणगाव जि. हिंगोली 1, जाफराबाद 1, माजलगाव जि. बीड 1, चोपडा 1, परभणी 1, गोरनाळा ता. जामनेर 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 845 रुग्ण आढळले आहे.

819 रुग्‍णांची कोरोनावर मात

आज 819 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 263939 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 39221 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 5040 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 45291 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 5768 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 302 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.