जिल्ह्यात “एक विद्यार्थी एक वृक्ष” या मोहीम 15 ऑगस्टपासून

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिक्षण विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्या पुढाकाराने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून संपूर्ण जिल्ह्यात एक विद्यार्थी एक वृक्ष ही अभिनव वृक्ष क्रांती मोहीम शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. या भारत वृक्षक्रांती मोहिमेचे तथा एक विद्यार्थी एक वृक्ष या संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक ए. एस. नाथन यांच्या संकल्पनेतून ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात …
 
जिल्ह्यात “एक विद्यार्थी एक वृक्ष” या मोहीम 15 ऑगस्टपासून

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिक्षण विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्या पुढाकाराने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून संपूर्ण जिल्ह्यात एक विद्यार्थी एक वृक्ष ही अभिनव वृक्ष क्रांती मोहीम शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. या भारत वृक्षक्रांती मोहिमेचे तथा एक विद्यार्थी एक वृक्ष या संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक ए. एस. नाथन यांच्या संकल्पनेतून ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविली जाणार आहे. या वृक्षक्रांती मोहिमेची सुरुवात 15 ऑगस्टला जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे सकाळी 9.30 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषाताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्याहस्ते होणार आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कमलताई बुधवत, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा उपवन संरक्षक अक्षय गजभिये, विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण डी. एस. पायघन, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप आणि या मोहिमेचे मुख्य प्रवर्तक ए. एस .नाथन उपस्थित राहणार आहेत. या वृक्षक्रांती मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याला एक मोफत रोप देण्यात येणार असून जिल्ह्यात पाच लाख 14 हजार विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर विशेष गुण देण्यात येणार आहेत. या मोहिमेत सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.