जिल्ह्यात ऑक्सिजन अन्‌ रेमडेसिव्हीर औषधाचा मुबलक साठा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याची एकूण ऑक्सिजनची मागणी व त्याअनुषंगाने पुरवठ्याचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात आहे. जिल्ह्यासाठी मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा मे. माऊली उद्योग, अकोला व मे. इसीम गॅसेस, जालना यांच्याकडून निरंतर सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विभागाच्या व्यवस्थित नियोजनाने जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे. हा पुरवठा अखंडीतपणे सुरू राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याची एकूण ऑक्सिजनची मागणी व त्याअनुषंगाने पुरवठ्याचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात आहे. जिल्ह्यासाठी मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा मे. माऊली उद्योग, अकोला व मे. इसीम गॅसेस, जालना यांच्‍याकडून निरंतर सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विभागाच्या व्यवस्थित नियोजनाने जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे. हा पुरवठा अखंडीतपणे सुरू राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती आरोग्य विभागाच्या समन्वयाने काम करत आहेत. सद्यःस्थितीत बुलडाणा येथील शासकीय कोविड रुग्णालयात रेमडेसिव्हीर या औषधाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच आणखी साठा उपलब्ध व्हावा म्हणून आरोग्य विभागामार्फत मागणी नोंदविण्यात आली आहे. सर्व रुग्णांनी व वैद्यकीय व्यावसायिकांनी रेमडेसिव्हीर या औषधाच्या उपलब्धतेबाबत काही अडचणी आल्यास गजानन प्रल्हाद घिरके, औषध निरीक्षक, बुलडाणा यांच्‍याशी संपर्क करावा. सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन या कार्यालया मार्फत दैनंदिन उपलब्धतेचा आढावा घेण्यात येत असून, रेमडेसीव्हीर इंजेक्शची जिल्ह्यातील जनतेस कमतरता भासणार नाही.