जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती, रिफीलींग उद्योगासाठी पुढे या, परवाना लगेच मिळणार!

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात एकूण ऑक्सिजनच्या मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात आहे. जिल्ह्यासाठी मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा माऊली उद्योग अकोला, मे. इसीस गॅसेस जालना यांच्याकडून निरंतर सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. हा पुरवठा अखंडीतपणे सुरू राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी …
 

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात एकूण ऑक्सिजनच्‍या मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात आहे. जिल्ह्यासाठी मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा माऊली उद्योग अकोला, मे. इसीस गॅसेस जालना यांच्‍याकडून निरंतर सुरू ठेवण्यासाठी प्रयत्‍न सुरू आहे. हा पुरवठा अखंडीतपणे सुरू राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी आरोग्य विभागाच्‍या समन्वयाने काम करत आहेत.

जिल्ह्यामध्ये ऑक्सीजनचे एकही उत्पादन व रिफीलर नाहीत. जिल्ह्यात खासगी व शासकीय हॉस्पीटलमध्ये आवश्यक असणारा मेडीकल ऑक्सीजन हा परजिल्ह्यामधून मागविण्यात येत आहे. कोव्हीड – 19 या विषाणूजन्य आजारात रुग्णाचे वाढते प्रमाण पाहता भविष्यात मेडीकल ऑक्सीजनची जास्त गरज भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमित वेळीही ऑक्सीजनची शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना गरज राहते. जिल्ह्यातील घाऊक औषध विक्रेता किंवा ज्यांना हा व्यवसाय करावयाचा आहे, त्यांनी पुढे यावे. ऑक्सीजन निर्मिती किंवा रिफीलींगचा उद्योग जिल्ह्यातच निर्माण करावा. त्यासाठी त्यांनीअन्‍न व औषध प्रशासन कार्यालयातील सहायक आयुक्त (औषधे) अशोक बर्डे, औषध निरिक्षक गजानन प्रल्हाद घिरके यांच्‍याशी संपर्क साधावा. जेणेकरून असे व्यावसायीक पुढे आल्यास ऑक्सीजन उत्पादन, रिफीलींग तसेच घाऊक व्यवसाय करणाऱ्यांना कार्यालयातील अधिकारी परवाना मिळण्यासाठी त्वरित मदत करतील. अशा उद्योगांना परवाना देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग तत्पर आहे. जिल्ह्यातील जागरुक नागरिकांनी रुग्णहिताच्या दृष्टीकोनातून समोर येवून सामाजिक हित जोपासावे असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषधे प्रशासन यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.