जिल्ह्यात कोरोनाचे नवे २ रुग्‍ण!; २४ जण घेताहेत उपचार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 26 ऑगस्टला कोरोनाचे दोन नवे रुग्ण समोर आले असून, दोन रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 24 रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1596 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1594 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 2 अहवाल …
 
जिल्ह्यात कोरोनाचे नवे २ रुग्‍ण!; २४ जण घेताहेत उपचार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 26 ऑगस्‍टला कोरोनाचे दोन नवे रुग्‍ण समोर आले असून, दोन रुग्‍णांना बरे झाल्याने डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सध्या 24 रुग्‍ण रुग्‍णालयांत उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1596 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1594 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 2 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 364 तर रॅपिड टेस्टमधील 1230 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
देऊळगाव राजा तालुका : सावखेड भोई 1, बुलडाणा शहर : 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 2 रुग्ण आढळले आहेत.
आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू
आजपर्यंत 683754 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86686 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1594 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87382 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत 24 रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.