जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५ रुग्‍ण!; ३२ रुग्‍ण घेताहेत उपचार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 31 जुलैला कोरोनाचे नवे 5 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, यात चिखली शहरातील तीन, खामगाव शहरातील एक व देऊळगाव राजा तालुक्यातील सावंगी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1715 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1710 अहवाल कोरोना निगेटिव्ह …
 
जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५ रुग्‍ण!; ३२ रुग्‍ण घेताहेत उपचार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 31 जुलैला कोरोनाचे नवे 5 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, यात चिखली शहरातील तीन, खामगाव शहरातील एक व देऊळगाव राजा तालुक्‍यातील सावंगी येथील एका रुग्‍णाचा समावेश आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1715 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1710 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 5 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 3 व रॅपिड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 355 तर रॅपिड टेस्टमधील 1355 अहवालांचा समावेश आहे.

आजपर्यंत 639598 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86560 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1819 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87264 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 32 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.