जिल्ह्यात कोरोनाचे 5 बळी!; एकूण बाधितांचा आकडा 39 हजार पार!!; सुलतानपूरमध्ये कोरोना उद्रेक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 2 एप्रिलला कोरोनाने 5 बळी घेतले आहेत. उपचारादरम्यान (रायपूर ता. बुलडाणा) येथील 60 वर्षीय पुरुष, छत्रपतीनगर बुलडाणा येथील 60 वर्षीय पुरुष, पिंपळखुटा (ता. मलकापूर) येथील 80 वर्षीय पुरुष, लव्हाळा (ता. मेहकर) येथील 53 वर्षीय पुरूष व आव्हा (ता. मोताळा) येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 2 एप्रिलला कोरोनाने 5 बळी घेतले आहेत. उपचारादरम्यान (रायपूर ता. बुलडाणा) येथील 60 वर्षीय पुरुष, छत्रपतीनगर बुलडाणा येथील 60 वर्षीय पुरुष, पिंपळखुटा (ता. मलकापूर) येथील 80 वर्षीय पुरुष, लव्हाळा (ता. मेहकर) येथील 53 वर्षीय पुरूष व आव्हा (ता. मोताळा) येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्‍यान, दिवसभरात नव्‍या 665 बाधितांची भर पडली असून, 583 रुग्‍णांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज मिळाला आहे. लोणार तालुक्‍यातील सुलतानपूरमध्ये तब्‍बल 26 रुग्‍ण आढळल्‍याने गाव हादरले आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5986 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 5321 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 665 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 406 व रॅपीड टेस्टमधील 259 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 404 तर रॅपिड टेस्टमधील 4917 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 49, बुलडाणा तालुका : डोंगरखंडाळा 1, रायपूर 2, सुंदरखेड 8, पाडळी 2, पिंपळगाव सराई 1, चांडोळ 1, इरला 1, म्हसला 1, करडी 1, ढालसावंगी 1, रूईखेड 2, धाड 1,  येळगाव 3, देऊळघाट 3, सागवन 7, कोलवड 1, भादोला 1,  मोताळा शहर :13, मोताळा तालुका : सांगळद 1,जयपूर 1,  पुन्हई 2, खांडवा 3, किन्होळा 1, लिहा 13, बोराखेडी 4, महालपिंप्री 1, आव्हा 4, धामणगाव देशमुख 1, रामगाव 1, डिडोळा 1, रोहिणखेड 1, निपाणा 1, चिंचपूर 1, कोथळी 3, खामगाव शहर : 40, खामगाव तालुका : गणेशपूर 3, शिर्ला 1, लोणी गुरव 1, पिंपळगाव राजा 2, घाणेगाव 1,  घाटपुरी 3, आडगाव 1, चिंचपूर 1, दधम 1,  ढोरपगाव 2, भालेगाव 1, शेगाव शहर :40, शेगाव तालुका : झाडेगाव 3, गौलखेड 1, मनसगाव 1, डोंगरगाव 1, सिसगाव 1,  चिखली शहर :7, चिखली तालुका : पिंप्री आंधळे 1, ब्रह्मपुरी 1, मालगणी 2, वाघापूर 1, भरोसा 2, खंडाळा 1, रताळी 1, अंत्री कोळी 1, खैरव 4, भोकर 1, सावरगाव डुकरे 1, अमडापूर 2, शेलगाव आटोळ 1, सावरगाव 1,  गांगलगाव 2, मलकापूर शहर :17, मलकापूर तालुका : दाताळा 3, पिंपळखुटा 2, धरणगाव 3, दुधलगाव 1, भालेगाव 1, नरवेल 1, देऊळगाव राजा शहर : 11, देऊळगाव राजा तालुका : सातेफळ 2, सावखेड नागरे 1, सिनगाव जहाँगिर 2, खल्याळ गव्हाण 2, सावखेड भोई 2, पिंपळखुटा 1,  देऊळगाव मही 3, डोढ्रा 1, अंढेरा 1,   सिंदखेड राजा शहर : 28, सिंदखेड राजा तालुका : झोगा 1, हिवरखेड पुर्णा 1, शेंदुर्जन 1, वरूड 1, सातेगाव 1, दुसरबीड 2, आडगाव राजा 1, सोयदेव 1, नाव्हा 1, किनगाव राजा 1, भोसा 1, शिंदी 1, गुंज 3, साखरखेर्डा 2,   मेहकर शहर : 43, मेहकर तालुका : गोहेगाव 2, हिवरा आश्रम 6, पांगरखेड 1, करंजी 1, सारंगपूर 1, लोणी गवळी 2, गुंजखेड 1, लव्हाळा 4, देऊळगाव माळी 3, चिंचोली बोरे 1, अंजनी खुर्द 1, शेंदला 1, पेनटाकळी 1,  जानेफळ 8, मोहदरी 1,वाकड 1, मोहणा 1,  डोणगाव 5, दरेगाव 1, बोरी 1, भालेगाव 1, कळमेश्वर 1, नायगाव दे. 3, गुंज 5, नागापूर 1, कनका 1, संग्रामपूर शहर : 14, संग्रामपूर तालुका : सगोडा 2, सावळा 1, मारोड 1, आलेवाडी 1, पळशी 1, सोनाळा 3, वसाडी 1, पलसोडा 2, काकनवाडा 2,  टुनकी 1, वरवट बकाल 8, भोन 1, बावनबीर 6, कथरगाव 1, वानखेड 1, जळगाव जामोद शहर : 12, जळगाव जामोद तालुका :  गोळेगाव 1, मानेगाव 1, पिंप्री खोद्री 6, बहापुरा 2, माऊली ओटा 2,  वडजी 1, धानोरा 1, आसलगाव 4,  सावरगाव 10, खेर्डा बुद्रूक 6, नांदुरा शहर :11 , नांदुरा तालुका : बुर्टी 2, पोटा 2,  लोणार शहर : 17, लोणार तालुका : वढव 2, रायगाव 4, बिबी 1, वझर आघाव 1, हत्ता 1, ताडेगाव 1, मातमळ 1, पहूर 1, सरस्वती 1,  सावरगाव 1, पांगरा 2, शारा 2, देऊळगाव वायसा 1,  वेणी 1, पिंपळनेर 6, मातमळ 1, आरडव 2, गणपूर 3, सुलतानपूर 26, देऊळगाव 4, तांबोळा 1, गांधारी 1, जांभूळ 3, वडगाव 1, वझार कुटे 2, पळसखेड 1, परजिल्हा अकोट 1, मोरगाव भाकरे जि. अकोला 1, कौलखेड अकोला 1, निंबा ता. बाळापूर 2, रिसोड 2, नांदेड 1, धावडा ता. भोकरदन 1, वाशिम 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 665 रुग्ण आढळले आहेत.

5763 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आज 583 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 228411 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 33082 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 4282 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 39119 कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी 33082 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 5763 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 274 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.