जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार!; दिवसभरात 108 पॉझिटिव्‍ह नवे रुग्‍ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार गेला असून, आज, 5 मार्चला 108 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तसेच 356 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 930 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 822 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार गेला असून, आज, 5 मार्चला 108 नवे पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले आहेत तसेच 356 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 930 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 822 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 108 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 37 व रॅपीड टेस्टमधील 71 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 38 तर रॅपिड टेस्टमधील 784 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

खामगाव शहर : 31, खामगाव तालुका : शिर्ला नेमाने 1, सुटाळा बुद्रूक 1, घाटपुरी 1, अंत्रज 1, चिखली शहर : 17, चिखली तालुका : मेरा बुद्रूक 1, पेठ 1,खैरव 1, कोलारा 1, उंद्री 1, लोणार शहर : 5, लोणार तालुका : पांगरा दराडे 2, जळगाव जामोद शहर : 4, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 1, खेर्डा 1, वडशिंगी 1, सिंदखेड राजा शहर : 5, सिंदखेड राजा तालुका : दुसरबीड 1, रताळी 1, शेंदुर्जन 1, साखरखेर्डा 2, बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : साखळी 1, करडी 5, मोताळा तालुका : शेलापूर 1, नांदुरा तालुका : निमगाव 1,धानोरा 1, देऊळगाव राजा तालुका : जांभोरा 1, सिनगाव जहागीर 3, देऊळगाव मही 2, देऊळगाव राजा शहर : 2, मूळ पत्ता औरंगाबाद 1, खासगाव जि. जालना येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 108 रुग्ण आढळले आहेत.

356 रुग्‍णांनी कोरोनावर मात

आज 356 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः चिखली : 65, खामगाव : 34, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 2, अपंग विद्यालय 77, मुलींचे वसतिगृह 4, सहयोग हॉस्पीटल 1, देऊळगाव राजा : 37, मेहकर : 1, लोणार : 3, जळगाव जामोद : 43, सिंदखेड राजा : 12, नांदुरा : 3, मलकापूर : 33, शेगाव : 20, मोताळा : 10, संग्रामपूर : 10.

2244 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 145068 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 17649 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 9030 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 20088 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 2244 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 195 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.