जिल्ह्यात दिवसभरात आढळले 30 नवे कोरोनाबाधित रुग्ण; 38 जणांनी केली कोरोनावर मात

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 2 जानेवारीला नवे 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 38 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 911 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 881 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 30 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 2 जानेवारीला नवे 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 38 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 911 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 881 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 30 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 28 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 826 तर रॅपिड टेस्टमधील 55 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 2, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : शेंबा खुर्द 1, खामगाव शहर : 3, खामगाव तालुका : धानोरा, चिखली शहर : 3, चिखली तालुका : वळती 2, चांधई 1, वैरागड 1, सवणा 1, अंत्री खेडेकर 1, अमडापूर 1, ईसोली 2, देऊळगाव राजा शहर : 2, मोताळा तालुका : रोहिणखेड 1, पिंपळपाटी 1, थळ 1, पिंपळगाव देवी 4, देऊळगाव राजा तालुका : पिंपळनेर 1

38 रुग्णांनी केली कोरोनावर मात

आज 38 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण ः खामगाव : 11, सिंदखेड राजा : 4, चिखली : 3, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 1, अपंग विद्यालय 7, स्त्री रुग्णालय 1, शेगाव : 1, नांदुरा : 2, देऊळगाव राजा : 8.

243 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 90684 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12215 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 1255 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 12610 कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी 12215 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे सध्या रुग्णालयांत 243 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 152 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.