जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 17 सप्टेंबरला कोरोनाचे 2 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत, तर 2 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या रुग्णालयांत 27 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1073 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1071 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, …
 
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 17 सप्‍टेंबरला कोरोनाचे 2 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले आहेत, तर 2 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सध्या रुग्‍णालयांत 27 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1073 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1071 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 2 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 254 तर रॅपिड टेस्टमधील 817 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
देऊळगाव राजा तालुका : जवळखेड 1, परजिल्हा सगड (ता. बाळापूर) 1.

एकूण बाधितांचा आकडा 87539 वर
आजपर्यंत 708398 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86839 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 845 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 708398 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87539 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आजपर्यंत 673 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.