जिल्ह्यात नव्या 38 कोरोनाबाधितांची भर!; 34 रुग्णांना डिस्चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 26 जानेवारीला 38 कोरोनाबाधितांची भर पडली आहे, तर दिवसभरात 34 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 905 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 867 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 38 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 26 जानेवारीला 38 कोरोनाबाधितांची भर पडली आहे, तर दिवसभरात 34 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 905 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 867 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 38 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 34 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 774 तर रॅपिड टेस्टमधील 93 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
देऊळगाव राजा शहर : 6, देऊळगाव राजा तालुका : सावखेड नागरे 1, गोंधणखेड 1, जळगाव जामोद तालुका : बांडा पिंपळ 1, पळशी सुपो 1, दौतपूर 1, लोणार तालुका : खुरमपूर 2, महार चिकना 1, लोणार शहर :2, मेहकर शहर : 8, चिखली शहर :1, चिखली तालुका : भालगाव 1, अंचरवाडी 1, बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : पाडळी 1, सिंदखेड राजा शहर :2, सिंदखेड राजा तालुका : मलकापूर पांग्रा 1, किनगाव राजा 1, खामगाव शहर : 1, शेगाव शहर ः 3
34 रुग्णांची कोरोनावर मात
आज 34 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे : देऊळगाव राजा : 4, चिखली : 1, बुलडाणा : अपंग विद्यालय 19, शेगाव :3, नांदुरा :2, सिंदखेड राजा: 2, लोणार :1, मेहकर :2.
292 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 103514 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13243 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच 3296 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13701 कोरोनाबाधित रूग्ण असून, सध्या रुग्णालयात 292 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 166 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.