जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्री, साठवणुकीवर बंदी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करून बनविण्यात आलेल्या व सर्वसाधारण नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या मांजाच्या निर्मिती, विक्री व साठवणूक करण्यावर संपूर्ण जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.मकर संक्रांत या सणाच्या अनुषंगाने पतंग उडवितात. मात्र या पतंगाला नायलॉन मांजा वापरल्यामुळे पक्षी व मानव जीवितास इजा पोहोचते. त्यामुळे जिल्ह्यात पर्यावरण …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करून बनविण्यात आलेल्या व सर्वसाधारण नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या मांजाच्या निर्मिती, विक्री व साठवणूक करण्यावर संपूर्ण जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.
मकर संक्रांत या सणाच्या अनुषंगाने पतंग उडवितात. मात्र या पतंगाला नायलॉन मांजा वापरल्यामुळे पक्षी व मानव जीवितास इजा पोहोचते. त्यामुळे जिल्ह्यात पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 चे कलम 5 अन्वये सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणूक करणारे यांना नायलॉन मांजा विक्री व साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था यांनी उल्लंघन केल्यास ही बाब पर्यावरण अधिनियम अंतर्गत शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हा दंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी कळविले आहे.