जिल्ह्यात निधी आलाय, कामे सुरू करा अन् कालावधीत खर्चही करा!; पालकमंत्री डॉ. शिंगणे यांचे निर्देश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे निधी खर्च करण्यावर मर्यादा होत्या. आता मात्र जिल्हा नियोजन समितीचा संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार यंत्रणांनी सन 2020-21 मधील प्राप्त निधी विहीत कालावधीत खर्च करावा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे निधी खर्च करण्यावर मर्यादा होत्या. आता मात्र जिल्हा नियोजन समितीचा संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार यंत्रणांनी सन 2020-21 मधील प्राप्त निधी विहीत कालावधीत खर्च करावा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.
जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात 22 जानेवारीला करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, उपवनसंरक्षक श्री. गजभिये, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, प्र. अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, उपवनसरंक्षक (वन्यजीव) श्री. रेड्डी  आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना करत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. या वर्गखोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून खोल्या दुरूस्त करून घ्याव्यात. तसेच ज्या खोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट झालेले आहे, त्यांचे तातडीने काम करावे. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून पैसा दिला जाईल. शाळांमध्ये स्वच्छतागृह असावीत. प्रत्येक शाळेत मुलींसाठी प्राधान्याने स्वच्छतागृह करावे. ज्या शाळेत स्वच्छतागृह नाहीत, अशा ठिकाणी प्राधान्याने काम पूर्ण करावे. तालुका क्रीडा संकुल, क्रीडांगण विकासाचे प्रस्ताव सादर करावेत. तसेच पोलीस व सैन्य भरतीसाठी शारीरिक चाचणीसाठी तयारी करणार्‍या तरुणांसाठी मोठ्या गावांमध्ये सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
तांडा वस्ती सुधार योजनेमध्ये वाढीव निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावे. महिला व बालविकास विभागाचे अंगणवाडीमध्ये देण्यात येणार्‍या पोषण आहाराची तपासणी करावी. त्याचे वजन व दर्जा नियमित तपासत रहावा. आरोग्य विभागाने कोरोना या संकटाला संधी बनवून जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था बळकटीकरणाचा प्रस्ताव तयार करावा. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय व अन्य शासकीय रुग्णालयांमधील फायर ऑडीट करून घ्यावे. रुग्णालयांत अग्निशमन यंत्रणा बळकट करावी व नसल्यास ती तात्काळ उभारावी. यासाठी आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून दिल्या जाईल.  सीएसआर मधून सिंदखेड राजा येथे रक्तपेढी मंजूर करण्यात आली आहे. यापद्धतीने अन्य ठिकाणी रक्तपेढी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावे. जिल्हा सामान्य रूग्णालयाची इमारत फार जुनी आहे. या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. इमारत मंजूर झाल्यास तोपर्यंत रुग्णांसाठी पर्यायी जागा तयार ठेवावी. या इमारतीसाठी शासनाकडून निधी आणण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले. याप्रसंगी संबंधित यंत्रणा प्रमुखांनी आपल्या विभागाची माहिती दिली. सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. वायाळ यांनी जिल्हा वार्षिक योजनेचे  सादरीकरण केले. अनुसूचित जाती उपयोजनेचे सादरीकरण सहाय्यक आयुक्त श्रीमती राठोड यांनी केले. बैठकीला संबंधीत यंत्रणांचे विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.