जिल्ह्यात पावसाची संततधार; संग्रामपूर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. परिणामी खरीपाची पिके पावसासाठी आसुसली. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी सिंचन सुरू केले, तर व्यवस्था नसलेले शेतकरी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात कुठे जोरदार, तर कुठे रिपरिप पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्हावासियांना अनुभवायला मिळत आहे. जिल्ह्यात सकाळी 8 …
 
जिल्ह्यात पावसाची संततधार; संग्रामपूर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. परिणामी खरीपाची पिके पावसासाठी आसुसली. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी सिंचन सुरू केले, तर व्यवस्था नसलेले शेतकरी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात कुठे जोरदार, तर कुठे रिपरिप पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्हावासियांना अनुभवायला मिळत आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार संग्रामपूर तालुक्यात सर्वात जास्त 20.7 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात आज, 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद अशी ः (कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची) सर्वात जास्त पाऊस संग्रामपूर : 20.7 मि.मी. (395.6 मि. मी.), मलकापूर : 20.6 (267.7 मि. मी.), जळगाव जामोद : 16.6 (207.6), नांदुरा: 11.9 (296), देऊळगाव राजा : 10 (440.9), शेगाव : 9.3 (240.7), लोणार : 8.3 (588.2), मोताळा : 8.3 (315.1), चिखली : 7.4 (505.6), सिंदखेड राजा : 7 (632.7), बुलडाणा : 6.4 (430.5), खामगाव : 5.1 (435) आणि सर्वात कमी मेहकर तालुक्यात 4.9 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली. आजपर्यंत सर्वात कमी 207.6 मि. मी. पावसाची नोंद जळगाव जामोद तालुक्यात करण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 136.5 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, त्याची सरासरी 10.5 मि. मी. आहे. आतापर्यंत सर्वात जास्त 776 मि. मी. पाऊस मेहकर तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस जळगाव जामोद तालुक्यात 207.6 मि. मी. झाला आहे. जिल्ह्यात 1 जून 2021 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी 425.6 मि. मी. आहे.