जिल्ह्यात बर्ड फ्लूची एंट्री होताच मटन विक्रेत्यांची पळापळ

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात काल, 26 जानेवारीला गणतंत्र दिनाच्या शुभमुहूर्तावर बर्ड फ्लूच्या एंट्रीची अशुभ वार्ता कानी पडताच अनेकांनी चिकनचे बेत रद्द करत मटन आणले. मात्र मागणीच्या तुलनेत बकरे, मेंढ्या उपलब्ध होत नसल्याने मटणविक्रेत्यांची पळापळ सुरू झाली आहे.मागणी वाढल्याने एक किलो मटणाची विक्री 650 ते 650 रुपये दराने केली जात आहे. लॉकडाउनमुळे बाहेर पडणे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात काल, 26 जानेवारीला गणतंत्र दिनाच्या शुभमुहूर्तावर बर्ड फ्लूच्या एंट्रीची अशुभ वार्ता कानी पडताच अनेकांनी चिकनचे बेत रद्द करत मटन आणले. मात्र मागणीच्या तुलनेत बकरे, मेंढ्या उपलब्ध होत नसल्याने मटणविक्रेत्यांची पळापळ सुरू झाली आहे.
मागणी वाढल्याने एक किलो मटणाची विक्री 650 ते 650 रुपये दराने केली जात आहे. लॉकडाउनमुळे बाहेर पडणे दुरापास्त झाले होते. त्या वेळी शेळ्या, मेंढ्यांच्या चरण्यावर; तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला होता. त्यामुळे दर वाढले होते. त्यानंतर आता चिकनकडे पाठ फिरविल्याने दर वाढल्याचे दिसून आले आहे. अवेळी झालेल्या पावसामुळे ओला चारा खाणार्‍या शेळ्या, मेंढ्यांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. बकरे, मेंढीच्या वाढीसाठी साधारणपणे अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. साधारणपणे तीन ते साडेतीन महिन्यांनंतर एका बकर्‍याचे वजन दहा किलोपर्यंत भरते. यंदाच्या वर्षी अवकाळी पावसाने मेंढ्यांच्या गर्भधारणेवर परिणाम झाला. ढगाळ वातावरणात मेंढ्या आजारी पडतात. या कालावधीत त्या पाणीही पित नाहीत. त्यामुळे मेंढी, बकर्‍यांच्या वाढीवर परिणाम होतो.

शेळ्या, मेंढ्यांच्या वाढीवर परिणाम
बकर्‍यांचे मुख्य अन्न चारा आहे. अवेळी झालेल्या पावसामुळे ओला चारा खाणार्‍या शेळी, मेंढ्यांच्या वाढीवर परिणाम झाला. ओला चार्‍यामुळे त्यांचे वजन वाढले नाही. थंडीत बकर्‍यांना सुका चारा दिला जातो. साधारण संक्रांतीनंतर नवीन बकरे बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतात. मागणी आणि पुरवठा याचा समतोल बिघडला आहे. नैसर्गिक वातावरणात बकर्‍यांची वाढ उत्तम होते. यंदा अवेळी झालेल्या पावसामुळे बकर्‍यांच्या वाढीवर परिणाम झाला, असे निरीक्षण मटण विक्रेत्यांनी नोंदविले.