जिल्ह्यात वन पर्यटनास परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील सर्व वन पर्यटन केंद्र सुरू करण्यास काही अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रीय संरक्षित स्मारके, स्थळे व संग्रहालयांना आता कोरोनाविषयक नियम पाळून भेटी देता येईल. पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींनी मास्कचा वापर, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. बंदिस्त प्राण्यांच्या ठिकाणी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील सर्व वन पर्यटन केंद्र सुरू करण्यास काही अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रीय संरक्षित स्मारके, स्थळे व संग्रहालयांना आता कोरोनाविषयक नियम पाळून भेटी देता येईल.

पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींनी मास्कचा वापर, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. बंदिस्त प्राण्यांच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास प्रतिबंध असेल. वाहनांमुळे बफर परिक्षेत्रात रस्ते खराब होणार नाहीत व संरक्षणावर विपरीत परिणाम होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. पर्यटकांची थर्मल स्कॅनिंग करणे आवश्यक असणार आहे. पर्यटकाला प्रवेश देतेवेळी पायाने ऑपरेट होणारे सॅनिटायझर मशीन किंवा संपर्कहीन हँड सॅनीटायझर मशीन वापरणे बंधनकारक आहे. या ठिकाणी वन विश्रामगृह, निसर्ग पर्यटन संकुल, उपहार गृह, होम स्टे व इतर उपक्रमही सुरू करण्यात आले आहेत. मात्र जिल्ह्यात सकाळी ४ ते सायंकाळी ५ पर्यंत जमावबंदी लागू असून, सायंकाळी ५ नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू आहे. त्यामुळे वनपर्यटन केवळ सकाळी ७ ते दुपारी ४ या कालावधीत सुरू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधत्मक कायदा, भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन कायदा मधील कलमान्वये शिक्षेस पात्र असेल, असे जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आदेशीत केले आहे.