जिल्ह्यात सावकारांचेच फावतेय… 36 शेतकर्‍यांना पसरावे लागले हात!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बँका कर्ज देताना हात आखडता घेत असल्याने जिल्ह्यात सावकारांचे फावले असून, तब्बल 36 शेतकर्यांना सावकाराकडे हात पसरावे लागल्याचे समोर आले आहे.5 लाख 66 हजार रुपयांचे कृषी कर्ज सावकारांनी शेतकर्यांना दिले आहे. जिल्ह्यात 122 परवानाधारक सावकार आहेत. तब्बल 12 कोटी 30 लाख 14 हजार 919 रुपयांचे कर्ज सावकारांनी कृषी आणि अकृषक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बँका कर्ज देताना हात आखडता घेत असल्याने जिल्ह्यात सावकारांचे फावले असून, तब्बल 36 शेतकर्‍यांना सावकाराकडे हात पसरावे लागल्याचे समोर आले आहे.5 लाख 66 हजार रुपयांचे कृषी कर्ज सावकारांनी शेतकर्‍यांना दिले आहे. जिल्ह्यात 122 परवानाधारक सावकार आहेत. तब्बल 12 कोटी 30 लाख 14 हजार 919 रुपयांचे कर्ज सावकारांनी कृषी आणि अकृषक क्षेत्रात वाटले आहे.  14 हजार 225 जणांनी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. गेल्याच वर्षी 55 शेतकर्‍यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यात आले होते. त्यांची 59 हेक्टर जमीनही सोडविण्यात आली होती. आता पुन्हा 36 शेतकर्‍यांभोवती सावकारीचा फास पडला आहे. परवानाधारक सावकार कृषी कर्जासाठी वर्षाला 9 टक्के व्याज घेतात.