जिल्ह्यात २ आत्‍महत्‍या… एकाने विहिरीत उडी घेतली, दुसऱ्याने गोठ्यात लावून घेतला फास!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात दोन आत्महत्या समोर आल्या असून, देऊळगाव राजा येथील ४५ वर्षीय व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन तर नांदुरा तालुक्यातील आंबोडा येथील ७० वर्षीय वृद्धाने गोठ्यात गळफास लावून घेतला. बँकेकडून कर्ज मिळण्यास दिरंगाई झाल्याने आलेल्या नैराश्यातून ४५ वर्षीय व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंभोरा (ता. देऊळगाव राजा) शिवारात १२ …
 
जिल्ह्यात २ आत्‍महत्‍या… एकाने विहिरीत उडी घेतली, दुसऱ्याने गोठ्यात लावून घेतला फास!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात दोन आत्‍महत्‍या समोर आल्या असून, देऊळगाव राजा येथील ४५ वर्षीय व्‍यक्‍तीने विहिरीत उडी घेऊन तर नांदुरा तालुक्‍यातील आंबोडा येथील ७० वर्षीय वृद्धाने गोठ्यात गळफास लावून घेतला.

बँकेकडून कर्ज मिळण्यास दिरंगाई झाल्याने आलेल्या नैराश्यातून ४५ वर्षीय व्‍यक्‍तीने विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना अंभोरा (ता. देऊळगाव राजा) शिवारात १२ सप्‍टेंबरच्‍या रात्री समोर आली. राधेश्याम पाटीलबा जायभाये (रा. बालाजीनगर, देऊळगाव) असे आत्‍महत्‍या केलेल्या व्‍यक्‍तीचे नाव आहे. शहरापासून ३ किलोमीटर अंतरावरील गबाजी डिघोळे यांच्‍या शेतातील विहिरीत त्‍यांचा मृतदेह आढळला. देऊळगाव राजा पोलिसांना माहिती मिळताच त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. राधेश्याम यांचे भाऊ रामेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्‍यूची नोंद पोलिसांनी केली आहे.

दुसऱ्या घटनेत आंबोडा (ता. नांदुरा) येथील दादाराव संपत राऊत (७०) यांनी गुराच्‍या गोठ्यात लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतला. जलंब पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्‍यूची नोंद घेतली आहे. त्‍यांनी आत्‍महत्‍या का केली हे अद्याप समोर आलेले नाही. तपास पोहेकाँ सुभाष गावंडे करत आहेत.