जिल्ह्यात ३० ते ४४ वयोगटासाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, १९ जूनपासून ३० ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेस ७ आरोग्य संस्थांमधून सुरुवात करण्यात आली आहे. यात जिल्हा रुग्णालय बुलडाणा, ग्रामीण रुग्णालय चिखली, ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद, उप जिल्हा रुग्णालय शेगाव, ग्रामीण रुग्णालय मेहकर, प्राथमिक आरोग्य केंद्र बोराखेडी ता. मोताळा, प्राथमिक आरोग्य …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, १९ जूनपासून ३० ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेस ७ आरोग्य संस्थांमधून सुरुवात करण्यात आली आहे. यात जिल्हा रुग्णालय बुलडाणा, ग्रामीण रुग्णालय चिखली, ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद, उप जिल्हा रुग्णालय शेगाव, ग्रामीण रुग्णालय मेहकर, प्राथमिक आरोग्‍य केंद्र बोराखेडी ता. मोताळा, प्राथमिक आरोग्‍य केंद्र नांदुरा आदींचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लवकरच लसीकरण मोहीम कार्यान्वित होईल, असे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. गोफणे यांनी कळविले आहे.