जिल्ह्यात ९ ते १६ ऑगस्ट दरम्यान रानभाजी महोत्सव

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस असल्याने ९ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान बुलडाणा कृषी विभागातर्फे रानभाजी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रानभाजी पूर्णपणे नैसर्गिकरित्या येत असल्याने आरोग्य विषयक महत्त्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना महोत्सवाच्या माध्यमातून जनतेला कळणार आहे. रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असतात. त्यावर कुठल्याही प्रकारची …
 
जिल्ह्यात ९ ते १६ ऑगस्ट दरम्यान रानभाजी महोत्सव

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस असल्याने ९ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्‍यान बुलडाणा कृषी विभागातर्फे रानभाजी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रानभाजी पूर्णपणे नैसर्गिकरित्या येत असल्याने आरोग्य विषयक महत्त्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना महोत्सवाच्या माध्यमातून जनतेला कळणार आहे.

रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असतात. त्यावर कुठल्याही प्रकारची किटकनाशकाची व बुरशीनाशकाची फवारणी होत नाही. आदिवासी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी रानभाजी महोत्सव स्पर्धा ही ९ ऑगस्ट रोजी (चारबन ता. जळगाव जामोद) येथे सकाळी ९ वाजता आयोजित केला आहे. स्पर्धेत रानभाज्या व रान फळांची वैशिष्ट्ये भाजीची पाककृती (रेसिपी) करून दाखवण्यासाठी आयोजन करण्यात येणार आहे. आदिवासी प्रवर्गासाठी महिला व पुरुष शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागमार्फत करण्यात येत आहे. दैनंदिन आहारात रानभाजीच्या जास्तीत जास्त समावेश व्हावा व जनजागृती व्हावी म्हणून तालुक्यामध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय रानभाजी महोत्सवाची तारीख व ठिकाण

  • जळगाव जामोद : चारबन ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता, पंचायत समिती सभागृह १० ऑगस्ट रोजी
  • बुलडाणा : चिंचोले चौक, बुलडाणा १२ ऑगस्ट रोजी
  • चिखली : तालुका कृषि अधिकारी कार्यालय प्रांगण, चिखली ९ ऑगस्ट रोजी
  • मोताळा : पंचायत समिती सभागृह मोताळा १२ ऑगस्ट रोजी
  • मलकापूर : मलकापूर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती ११ ऑगस्ट रोजी
  • खामगाव : तालुका कृषि अधिकारी कार्यालय प्रांगण, खामगाव १२ ऑगस्ट रोजी
  • शेगाव : पंचायत समिती सभागृह, शेगाव १३ ऑगस्ट रोजी
  • संग्रामपूर : उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोनती अभियान,तालुका व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती संग्रामपूर १० ऑगस्ट रोजी
  • नांदुरा : पंचायत समिती सभागृह, नांदुरा १२ ऑगस्ट रोजी
  • मेहकर : पंचायत समिती सभागृह, मेहकर १३ ऑगस्ट रोजी
  • लोणार : पंचायत समिती सभागृह, लोणार १२ ऑगस्ट रोजी
  • सिंदखेड राजा : पंचायत समिती सभागृह, सिंदखेड राजा १३ ऑगस्ट रोजी
  • देऊळगाव राजा : फरस बालाजी मंदिराजवळ देऊळगाव राजा १२ ऑगस्ट रोजी

महोत्सवातील रानभाज्या
करुटली, ज्योती फुले, फांजीची भाजी, हेटा फुले, अळू पाने, तांदूळ जीरा, अंबाडी, शेवगा, बांबू कोंब, सफेद मुसळी, गुळवेल, पाथरी, फांद्याच्‍या भाजी, शेवगा, तरोटा, चीवळ, उंबर, केना, आघाडा, पिंपळ, उंबर, कवठ, कुरडू, ,जेटूली फुले, घोळभाजी.