जिल्ह्यात ॲट्रॉसिटीचे दोन गुन्‍हे दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खेडी (ता. मोताळा) येथील मायलेकीला शिविगाळ व मारहाण केल्या प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी मोरे कुटुंबातील 10 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत, दुसऱ्या घटनेत ठेकेदारीने धुलाईचे काम करणाऱ्या महिलेने जातिवाचक शिविगाळ केल्याचा आरोप केल्याने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयाच्या सहायक परिचारिकेविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खेडी (ता. मोताळा) येथील मायलेकीला शिविगाळ व मारहाण केल्या प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी मोरे कुटुंबातील 10 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध स्वरुपाचे गुन्‍हे दाखल केले आहेत, दुसऱ्या घटनेत ठेकेदारीने धुलाईचे काम करणाऱ्या महिलेने जातिवाचक शिविगाळ केल्याचा आरोप केल्याने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्‍णालयाच्‍या सहायक परिचारिकेविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

सौ. संध्या रवींद्र खंडारे (35, रा. ग्रामीण रुग्‍णालय क्‍वार्टर, जळगाव जामोद) या ग्रामीण रुग्णालयात ठेकेदारीने धुलाई सेवेचे काम 4 वर्षांपासून करतात. त्‍यांच्‍या शेजारीच स्‍नेहल भगत या सहायक परिचारिका राहतात. भगत यांनी सौ. खंडारे यांच्‍याबद्दल धुलाई कंत्राट घेतलेल्या बुलडाणा येथील ठेकेदाराकडे 21जूनला तक्रार केली होती. त्‍यावरून ठेकेदाराने तुम्ही दवाखान्यात काम करत नाही. नर्सशी चांगले वागत नाहीत. तुमची तक्रार आमच्‍याकडे आली आहे, असे सुनावले होते. 24 जूनला भगत यांनी शिविगाळ केल्याची तक्रार सौ. खंडारे यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात केली होती. 27 जूनलाही त्‍यांना भगत यांनी शिविगाळ केल्याचा आरोप सौ. खंडारे यांनी केला आहे. त्‍यावरून पोलिसांनी भगत यांच्‍याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह अन्य कलमान्वये गुन्‍हा दाखल केला आहे.

खेडी येथील घटनेप्रकरणी सौ. राधाबाई गोविंदा तायडे (70) यांनी तक्रार दिली की संजू मोरे, चंदा मोरे, रोशन चंदा मोरे, अभिषेक चंदा मोरे, दीपक मातडे, रवींद्र मोरे, रवींद्र मोरे यांचा मुलगा ईश्वर मोरे, किरण मोरे, किशोर मोरे (सर्व रा. खेडी) यांनी सौ. राधाबाईंची मुलगी केसरबाई भालेराव हिने पोलीस स्टेशनला आरोपींविरुध्द रिपोर्ट दिल्याचा राग मनात धरून शिविगाळ व मारहाण केली. घरात घुसून या मायलेकींना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली व जातिवाचक शिविगाळ केली, असे तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.