जिल्ह्यात 1 मेपर्यंत कडक संचारबंदी! पॉझिटिव्ह कामगाराला वैद्यकीय रजा, पूर्ण वेतन; धार्मिक स्थळे बंदच; 5 रुग्ण आल्यास सोसायटी कंटेनमेन्ट झोन; होम डिलिव्हरी प्रवेशद्वारापर्यंतच!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाच्या धर्तीवर आज 14 एप्रिलच्या मुहूर्तावर जिल्ह्यातही कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज रात्री 8 वाजेपासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत हे कलम 144 लागू राहणार आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांच्या वेळा पूर्वीप्रमाणेच …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाच्या धर्तीवर आज 14 एप्रिलच्या मुहूर्तावर जिल्ह्यातही कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज रात्री 8 वाजेपासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत हे कलम 144 लागू राहणार आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांच्या वेळा पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. तसेच वाहतूक, ऑटो, एसटी बस खासगी वाहतूक, उद्योग यासंदर्भतील यापूर्वीचे निर्देश कायम आहेत. मात्र बसमध्ये उभ्याने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. ऑटोमध्ये चालक अधिक 2, टॅक्सीमध्ये चालक अधिक वाहन क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी अशी मुभा आहे. किराणा, डेअरी, बेकरी, मिठाई, भाजीपाला, फळे विक्रेते, शीतगृहे यांना मुभा आहे. पशु वैद्यकीय दवाखाने, औषध, पशु खाद्य दुकाने, पेट्रोलपंप, गॅस सेवा, एटीएम, या सेवा सुरू राहतील.

हायलाईट्स

  • गृह निर्माण सोसायटीमध्ये 5 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास ती कंटेन्मेंट झोन घोषित होणार.
  • निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी सोसायटीवर राहणार, भंग केल्यास 10 हजार रुपये दंड.
  • घरगुती मदतनिस, कामगार, चालक यांच्या बाबतीत नगर परिषद, ग्राम पंचायत घेणार निर्णय
  • धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंदच राहणार.
  • उपहारगृहे, हॉटेल मधून फक्त पार्सल सेवा.
  • अपार्टमेंटच्या, सोसायटीच्या प्रवेशद्वारावर घ्यावी लागेल होम डिलिव्हरी, संबंधित कर्मचाऱ्यांना लसीकरण व कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक.
  • एखादा कामगार पॉझिटिव्ह आला तर सॅनिटायझिंग केल्याशिवाय युनिट चालू करता येणार नाही. पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याला वैद्यकीय रजा मिळेल व त्याचे त्या काळातील वेतन कापता येणार नाही.
  • चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सामाजिक सभागृहे बंदच.