जिल्ह्यात 26 ठिकाणी होणार क्षयरोगाच्या निदानासाठी थुंकी तपासणी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यामध्ये डीएससी मान्यताप्राप्त सूक्ष्मतादर्शक एकूण 26 केंद्रे आहेत. तेथे थुंकी नमुन्यांची तपासणी करून क्षयरोगाचे निदान करण्यात येते. प्रत्येक क्षयरोग पथकात एक वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक कार्यरत आहे. जिल्ह्यात डीएमसीसाठी 1 वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, 6 शहरी भागासाठी 6 टी. बी. एच. व्ही. कार्यरत आहेत. तसेच सुधारित राष्ट्रीय …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यामध्ये डीएससी मान्यताप्राप्त सूक्ष्मतादर्शक एकूण 26 केंद्रे आहेत. तेथे थुंकी नमुन्यांची तपासणी करून क्षयरोगाचे निदान करण्यात येते. प्रत्येक क्षयरोग पथकात एक वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक कार्यरत आहे. जिल्ह्यात डीएमसीसाठी 1 वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, 6 शहरी भागासाठी 6 टी. बी. एच. व्‍ही. कार्यरत आहेत. तसेच सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत 5 प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

जिल्ह्यात एक जिल्हा क्षयरोग केंद्र आहे. तेथे जिल्हा क्षयरोग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आदी कार्यरत आहेत. जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला अंदाजे शासकीय रुग्णालयातून 130, खासगी डॉक्टरांकडून 120 असे एकूण अंदाजे 250 नवीन टि. बी. रुग्ण शोधून उपचारावर ठेवले जातात. दरवर्षी अंदाजे एकूण 2700 ते 2900 टि. बी. रुग्ण शोधून उपचारावर ठेवले जातात. तसेच जिल्ह्यामध्ये मार्च 2016 पासून क्षयरोगाचे निदान करण्यासाठी अत्याधुनिक सिबीनॅट मशिन उपलब्ध आहे. या मशिनद्वारे क्षयरोग तसेच एमडीआर रुग्णांचे निदान सुध्दा करता येते. थुंकी नमुने तसेच इतर अवयवाच्या टि. बी.ची सुध्दा तपासणी करता येते. केवळ 2 तासांमध्ये निदान होते. जिल्ह्यातील शासकीय खासगी डॉक्टर प्रयोगशाळा येथील संशयीत टि. बी. तसेच एमडीआर रुग्णांचे तपासणी मोफत करण्यात येते. सन 2025 पर्यंत क्षयरोग नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी प्रत्येक स्तरावर सहभाग घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. मिलींद पांडूरंग जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.