जिल्ह्यात 29 कोरोनाबाधितांची भर; 39 जणांना डिस्चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 24 जानेवारीला 29 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. दिवसभरात 39 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 952 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 923 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 29 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 24 जानेवारीला 29 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. दिवसभरात 39 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 952 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 923 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 29 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 23 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 747 तर रॅपिड टेस्टमधील 176 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
चिखली तालुका : अंत्री खेडेकर 2, मुंगसरी 1, शेलूद 1, भिवगाव 1, चिखली शहर : 3, देऊळगाव राजा शहर : 3, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहागीर 1, लोणार शहर : 2, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, बुलडाणा शहर : 7, मोताळा तालुका : वडगाव 3, सिंदखेड राजा तालुका : वर्दडी 1, उमरद 1, मूळ पत्ता जालना येथील 1 असे एकूण 29 कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.
39 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 39 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : अपंग विद्यालय 5, स्त्री रुग्णालय 2, चिखली : 1, मोताळा : 3, खामगाव : 13, नांदुरा : 4, जळगाव जामोद : 1, मलकापूर: 8, सिंदखेड राजा : 2.
315 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 100923 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13111 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 4934 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13590 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 13111 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 315 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 164 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.