जिल्ह्यात 31 जानेवारीला पोलिओ लसीकरण

पल्स पोलीओ लसीकरण मोहिम यशस्वीरित्या राबवावी ः जिल्हाधिकारीबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहीम 31 जानेवारीला राबविण्यात येणार आहे. यात शून्य ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलीओ डोस पाजण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पल्स पोलीओ लसीकरण मोहीम जिल्हा समन्वय …
 

पल्स पोलीओ लसीकरण मोहिम यशस्वीरित्या राबवावी ः जिल्हाधिकारी
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहीम 31 जानेवारीला राबविण्यात येणार आहे. यात शून्य ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलीओ डोस पाजण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पल्स पोलीओ लसीकरण मोहीम जिल्हा समन्वय समितीची सभा आज 27 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. गोफणे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात सर्व गावे, वाड्या, वस्ती, तांडे, विटभट्टी, मेंढपाळ, आदिवासी कुठल्याही स्तरावरील बालक वंचित राहणार नसल्याची काळजी घेण्याच्या सूचना करत जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरण झालेल्या सर्व बालकांच्या डाव्या करंगळीवर मार्कर पेनने खुण करण्यात यावी. यासाठी मोबाईल पथक, ट्रान्सीट टिम आदी सज्ज ठेवाव्यात. जिल्ह्यात ग्रामीण भागात 1 लक्ष 95 हजार 387 बालके असून शहरी भागात 59 हजार 120 बालके आहेत. अशाप्रकारे एकूण 2 लक्ष 54 हजार 507 लाभार्थी बालके अपेक्षीत आहे. सर्व बालकांना लसीकरणासाठी 2139 बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागासोबतच विविध विभागातून एकूण 5343 कर्मचार्‍यांचे सहकार्य राहणार आहे. त्यासाठी 412 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 130 मोबाईल टिम, 148 ट्रान्झीट टीम नियुक्त करण्यात आल्या आहेत.