जिल्ह्यात 44 नव्या कोरोनाबाधितांची भर; 46 रुग्णांना डिस्चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 10 जानेवारीला 44 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली, तर 46 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 416 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 372 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 44 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 10 जानेवारीला 44 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली, तर 46 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 416 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 372 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 44 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 39 व रॅपिड टेस्ट मधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 266 तर रॅपिड टेस्टमधील 106 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 7, अपंग विद्यालय 4, खामगाव शहर : 5, देऊळगाव राजा तालुका : देऊळगाव मही 1, देऊळगाव राजा शहर : 3, मोताळा शहर : 2, चिखली शहर : 7, शेगाव तालुका : जवळा 2, शेगाव शहर : 9, नांदुरा शहर : 1, चिखली तालुका : आमखेड 1, इसोली 1, चंदनपूर 1, काटोडा 1, मेहकर तालुका : भालगाव 1, सिंदखेड राजा तालुका : पळसखेड चक्का 1, मूळ पत्ता सावरखेड गोंधन ता. जाफराबाद 1, नांदुरा तालुका : धाडी 1

46 रुग्णांनी केली कोरोनावर मात

आज 46 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रुग्ण असे ः नांदुरा :8, शेगाव : 2, चिखली : 11, खामगाव : 13, मोताळा : 7, दे. राजा : 1.

315 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार

आजपर्यंत 93889 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12486 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 816 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 12958 कोरोनाबाधित रूग्ण असून जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 315 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 157 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.