जिल्ह्यात 45 खून, 74 बलात्कार, 509 गुन्हेगार देताहेत हातावर तुरी!; 11 जणांना चतुर्भूज करण्यात यश!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या वर्षी जिल्ह्यात 45 खून, 74 बलात्कार घडले. यासह काही गंभीर गुन्ह्यातील तब्बल 509 गुन्हेगार अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. 11 गुन्हेगार फरारी होते, त्यांना चतुर्भूज करण्यात यश आले असले तरी 509 गुन्हेगार मात्र वारंवार हातावर तुरी देत आहेत. यातील 20 जण गंभीर गुन्ह्यातील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.45 खुनाच्या घटनांपैकी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या वर्षी जिल्ह्यात 45 खून, 74 बलात्कार घडले. यासह काही गंभीर गुन्ह्यातील तब्बल 509 गुन्हेगार अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. 11 गुन्हेगार फरारी होते, त्यांना चतुर्भूज करण्यात यश आले असले तरी 509 गुन्हेगार मात्र वारंवार हातावर तुरी देत आहेत. यातील 20 जण गंभीर गुन्ह्यातील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.45 खुनाच्या घटनांपैकी 42 घटनांतील आरोपी जेरबंद आहेत. तीन प्रकरणांतील आरोपींचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेने यासाठी पथक कार्यान्वित केले असून, हे पथक लवकरच या आरोपींना पकडून आणेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.