जिल्ह्याला मिळाल्या नव्या ३० रुग्णवाहिका; आणखी २० येणार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून बुलडाणा जिल्ह्याला ३० रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. आज, ९ सप्टेंबरला पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रुग्णवाहिका चालवून सर्व काही ठीक …
 
जिल्ह्याला मिळाल्या नव्या ३० रुग्णवाहिका; आणखी २० येणार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून बुलडाणा जिल्ह्याला ३० रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. आज, ९ सप्टेंबरला पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रुग्णवाहिका चालवून सर्व काही ठीक आहे ना याची खात्री केली.

जिल्ह्याला मिळाल्या नव्या ३० रुग्णवाहिका; आणखी २० येणार!

मुखमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना संकटावर मात करून राज्य सरकार चांगले काम करत आहेत. जिल्ह्याला मिळालेल्या रुग्णवाहिका जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांना वितरित करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र हलविण्यासाठी या रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका बजावतील. २० रुग्णवाहिकांची दुसरी खेप सुद्धा बुलडाणा जिल्ह्याला लवकरच उपलब्ध होणार आहे, असे पालकमंत्री डॉ. शिंगणे यावेळी म्हणाले.