जिल्ह्यासाठी आवश्यकतेनुसार ऑक्सिजनची मागणीच नसल्याने तुटवडा; वाढीव मागणीची नोंद करण्याची आमदार श्वेताताई महाले यांची मागणी

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची आवश्यकतेप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून मागणीच नसल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला असून, जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणी प्रमाणे नोंदणी करून पुरवठा करण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, विभागीय आयुक्त आणि कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायोजनांसाठी नेमलेले समन्वयक भारतीय प्रशासन सेवेतील आश्विन …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची आवश्यकतेप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून मागणीच नसल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला असून, जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणी प्रमाणे नोंदणी करून पुरवठा करण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, विभागीय आयुक्त आणि कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायोजनांसाठी नेमलेले समन्वयक भारतीय प्रशासन सेवेतील आश्विन मुदगल यांच्‍याकडे केली. त्‍यावर जिल्हा प्रशासनाने खडबडून जागे होऊन आमदार महाले पाटील यांच्या मागणीप्रमाणे तातडीने वाढीव ऑक्सिजनची मागणी शासनाकडे नोंदविण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या सतर्कतेमुळे ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत पुढील धोका टळणार आहे.

अनोंदणीकृत खासगी दवाखान्यांना नोंदणी करून त्यांना सुद्धा ऑक्सिजन द्या

जिल्ह्यात खासगी रुग्णालयांना सुद्धा कोरोना उपचारासाठी परवानगी दिलेली आहे. परंतु काही खासगी दवाखाने अनोंदणीकृत असून मानवतेच्या दृष्टिकोन ठेवून कोरोनाचा उपचार करीत आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने शासकीय आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला असून नागरिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात धाव घेत आहे. परंतु ज्या अनोंदणीकृत दवाखान्यात रुग्ण उपचार घेत आहे त्यांना रेमडीसीवीर व ऑक्सिजनच्या कमतरतेचा फटका बसत आहे. त्यांना सुद्धा ऑक्सिजनची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे अनोंदणीकृत खासगी रुग्णालयांकडून तातडीने प्रस्ताव मागवून त्यांना कोरोनावर उपचार करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून कोरोनाचा खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना सुद्धा ऑक्सिजन , रेमडीसीवीर इंजेक्शन तसेच इतर जीवनावश्यक औषधे मिळून मृत्यू संख्या कमी करणे शक्य होईल, असे पत्रही आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.