जिल्‍हा प्रशासन राब राब राबतंय… अन्‌ एसटीवाले गाड्या खच्‍चून भरून नेताहेत… ‘बुलडाणा लाइव्‍ह’चा कॅमेरा फिरताच गाडी काही क्षणांत अर्धी रिकामी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाची यंत्रणा, पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. राब राब राबत आहे. दुसरीकडे एसटी प्रशासनाला मात्र त्याचे काहीच सोयरसूतक नसल्याचे धक्कादायक चित्र आज, 23 फेब्रुवारीला दुपारी समोर आले. एसटी बस खच्चून भरली होती. अनेक जण चक्क उभेही होते. 50 टक्क्यांचीच परवानगी असताना चालक-वाहकांना या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्‍हणून जिल्‍हा प्रशासनाची यंत्रणा, पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. राब राब राबत आहे. दुसरीकडे एसटी प्रशासनाला मात्र त्‍याचे काहीच सोयरसूतक नसल्याचे धक्‍कादायक चित्र आज, 23 फेब्रुवारीला दुपारी समोर आले. एसटी बस खच्‍चून भरली होती. अनेक जण चक्‍क उभेही होते. 50 टक्‍क्‍यांचीच परवानगी असताना चालक-वाहकांना या आदेशाचाच पत्ताच नव्‍हता, हे त्‍यापेक्षा गंभीर. कोरोना कुठून अन्‌ कसा वाढत असेल तर तो असा..असेच म्‍हणावे लागेल.

जिल्‍हाधिकाऱ्यांनी 1 मार्चपर्यंत कठोर लॉकडाऊन जारी केला आहे. लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने उघडण्यास मनाई केली आहे. सोबतच आंतरजिल्हा प्रवासी हतूक करण्यासाठी बसमधील एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यात यावी, त्यासाठी मास्क आणि बसचे निर्जंकीकरण करण्यात यावेत अशा सूचनासुद्धा दिल्‍या आहेत. मात्र जिल्‍हाधिकाऱ्यांच्या या आदेशाकडे बुलडाण्याच्‍या एसटी डेपोने दूर्लक्ष केल्याचे ‘बुलडाणा लाइव्ह’च्या समोर आले आहे. बुलडाणा आगारातून सुटणाऱ्या बऱ्याच वाहनांमध्ये आसनक्षमतेपेक्षा जास्त वाहतूक सुरू होती. गर्दी अधिक असल्याने काही प्रवासी उभे राहून प्रवास करताना दिसून आले. यासंदर्भात चालक आणी वाचकांना विचारणा केली असता आमच्यापर्यंत तसे कोणतेही आदेश नसल्याचे त्यांनी सांगितले.

बुलडाणा लाइव्ह इफेक्ट… लगेच अर्धी गाडी रिकामी!
बुलडाणा बस स्थानकावर उभ्या असलेल्या मेहकर आगाराच्या गाडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसलेले बुलडाणा लाइव्हच्या निर्दशनास आले. ही बाब चालक आणि वाहकाच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी लगेच वरिष्ठांना पत्रकार आल्याची बातमी दिली. वरिष्ठांनी लागलीच गाडी अर्धी रिकामी करण्याचे आदेश वाहकाला दिले. 50 टक्‍क्‍यांपर्यंत प्रवासी कमी केल्यानंतर गाडी मेहकरच्या दिशेने रवाना झाली.