जीन्स घातली म्हणून ‘ती’चा घेतला बळी!

लखनऊ : कालबाह्य रुढी, परंपरा अनेकदा बळी घेत असतात उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. एक किशोरवयीन मुलगी सामाजिक रुढी आणि कौटुंबिक परंपरेचा बळी ठरली. देवरियामध्ये एका कुटुंबातील आजोबा आणि काकांनी १७ वर्षीय मुलीची हत्या केली. सांवरेजी खारग गावात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीनं जीन्स आणि टी- शर्ट घातला. त्यामुळं आजोबा आणि काकांनी तिला …
 

लखनऊ : कालबाह्य रुढी, परंपरा अनेकदा बळी घेत असतात उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. एक किशोरवयीन मुलगी सामाजिक रुढी आणि कौटुंबिक परंपरेचा बळी ठरली. देवरियामध्ये एका कुटुंबातील आजोबा आणि काकांनी १७ वर्षीय मुलीची हत्या केली.

सांवरेजी खारग गावात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीनं जीन्स आणि टी- शर्ट घातला. त्यामुळं आजोबा आणि काकांनी तिला काठीनं मारहाण केली. त्यात तिचा बळी गेला. परवानगी नसताना तिनं जीन्स घातलेली त्यांना आवडली नाही ही मुलगी लुधियानामध्ये शिकत होती. आजोबांचा विरोध असताना तिनं जीन्स व इतर वेस्टन कपडे घालण्याचं धाडस केले. ती गावी आल्यापासून तिच्यावर निळ्या जीन्स घालू नये, म्हणून दबाव होता. मुलीनं ऐकलं नाही, म्हणून तिला मारहाण करण्यात आली त्यातच तिचा मृत्यू झाला.

मुलीच्या आजोबा आणि काकांनी तिला घरात जीन्स घालू नको, असं बजावलं होतं; पण मुलीनं ऐकलं नाही. यामुळे दोघांनाही राग आला आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. मुलीचं डोक भिंतीवर आदळलं. त्यातून रक्त वाहू लागलं. मुलगी जखमी होऊनही आजोबा आणि काका तिला रुग्णालयात घेऊन गेले नाहीत. त्यातच मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर पुरावा निष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह कासिया-पाटणा महामार्गावरील पाटणा पुलावरून फेकला; मात्र पुलाच्या ग्रिलवर मृतदेह अडकला. मृतदेह तेथे काही तास लटकत राहिला. लोकांनी पोलिसांना माहिती दिली. मुलीचे आजोबा हे रिक्षा चालक आहे. त्यांना अटक करण्यात आली मुलीचे काका अद्याप फरार आहेत. मुलीच्या आईनं पोलिसांना माहिती दिलेली नाही.