जुगारात लागले होते लाख रुपये..!; ‘एलसीबी’ने उधळला डाव!!; 7 जणांना पकडले

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बोराखेडी (ता. मोताळा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांदूळवाडी शिवारात शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने छापा मारून 7 जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून जुगारात लागलेली लाख रुपयांची रक्कम व साहित्य असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज, 2 मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बोराखेडी (ता. मोताळा) पोलीस ठाण्याच्‍या हद्दीतील तांदूळवाडी  शिवारात शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या (एलसीबी) पथकाने छापा मारून 7 जुगाऱ्यांना पकडले. त्‍यांच्‍या ताब्‍यातून जुगारात लागलेली लाख रुपयांची रक्‍कम व साहित्‍य असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. ही कारवाई आज, 2 मे रोजी दुपारी साडेबाराच्‍या सुमारास करण्यात आली.

पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एलसीबीच्‍या पथकाने हा छापा मारला. यावेळी प्रकाश काशिराम सुरडकर (30, रा. तरोडा, ता. मोताळा), विजय गुलाबराव देठे (40, रा. वरुड ता. मोताळा), विजय शांताराम श्रीनाथ (35, रा. मोताळा), हिंमत बसंतदास बस्सी (40, रा. मोताळा), मंगेश पंढरी किरोचे (30, रा. मोताळा), रामेश्वर भास्कर जुनारे (30, रा. तांदुळवाडी, ता. नांदुरा), सुनील वासुदेव जुनारे (38, रा. तांदुळवाडी ता.नांदुरा) यांना पकडण्यात आले. सहा जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तांदुळवाडी शिवारातील रघुनाथ सुनिल जुनारे यांच्‍या शेतात जुगाराचा खेळ रंगला होता. पोलिसांनी जुगार साहित्य, 9 मोबाइल फोन (किंमत 50000) व नगदी 1,06,420 रुपये असा एकूण 1,56,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी आरोपींना बोराखेडी पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्यात आले आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्‍या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक नागेश कुमार चतरकर, पोलीस उपनिरिक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, नापोकाँ गजानन अहेर, नापोकाँ श्रीकृष्ण चांदूरकर, पोकाँ गजानन गोरले, पोकाँ सुभाष वाघमारे यांनी केली.