जुगार अड्ड्यावरील छाप्यात ७ जणांना पकडले; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्‍त; मेहकर तालुक्‍यातील कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील कनका शिवारात जुगार अड्ड्यावर छापा मारून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई काल, 1 जुलैला रात्री करण्यात आली. कनका शिवारात जुगाराचा डाव रंगल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून रात्रीच पथकाने कनका गाठून छापा मारला. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील कनका शिवारात जुगार अड्ड्यावर छापा मारून बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने सात जणांना ताब्‍यात घेतले. त्‍यांच्‍याकडून साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई काल, 1 जुलैला रात्री करण्यात आली.

कनका शिवारात जुगाराचा डाव रंगल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून रात्रीच पथकाने कनका गाठून छापा मारला. या ठिकाणी गुलाब मेरचंद राठोड (रा. कनका, ता. मेहकर), शेख वजीर शेख जलाल, राजू रायभान साळवे (रा. गोहोगाव, ता. मेहकर), शेख वसीम शेख अकबर, शेख सिद्दीक शेख बशीर, तोसीबी शहा इकबाल शहा, संजय निवृत्ती जमदाडे (सर्व रा. डोणगाव ता. मेहकर) यांना ताब्‍यात घेण्यात आले. त्‍यांच्‍याकडून रोख 27 हजार 300 रुपये, 10 मोटारसायकली (किंमत 4 लाख 70 हजार), 9 मोबाइल अंदाजे किंमत 30,000 असा एकूण 5 लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेकाँ लक्ष्मण कटक, पोकाँ गजानन गोरले, पोकाँ संभाजी असोलकर, पोकाँ विजय मुंढे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.