जुलै ते ऑगस्ट दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता; पालकमंत्र्यांची माहिती

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला असतानाच येत्या जुलै ते ऑगस्टदरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता राज्यस्तरीय टास्क फोर्सने वर्तवली असल्याची खळबळजनक व तितकीच गंभीर माहिती अन्न औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. याचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह राज्य सरकार सज्ज असल्याचे …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला असतानाच येत्या जुलै ते ऑगस्टदरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता राज्यस्तरीय टास्क फोर्सने वर्तवली असल्याची खळबळजनक व तितकीच गंभीर माहिती अन्न औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. याचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह राज्य सरकार सज्ज असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

डॉ. शिंगणे यांनी जालना येथील ऑक्सिजन निर्मिती केंद्राची नुकतीच पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्‍याच पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत टास्क फोर्समधील तज्‍ज्ञांनी ही शक्यता वर्तवल्याचे ते म्हणाले. यामुळे नजीकच्या काळात अगदी बुलडाणा जिल्ह्यालाही ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये यादृष्टीने राज्य ऑक्सिजन निर्मितीच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असावे यासाठी राज्य सरकार नियोजन करीत आहे. यासाठी 2 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे टार्गेट ठरविण्यात आले आहे. टास्क फोर्सने व्यक्त केलेला अंदाज लक्षात घेता केवळ ऑक्सिजनच नव्हे रेमेडिसीविर टॅब्लेट्‌सचाही मुबलक साठा असावा असे नियोजन करण्यात येत असल्याचे डॉ. शिंगणे यांनी यावेळी स्पष्ट केले.