जे तुझ्या नवऱ्याजवळ नाही ते माझ्याजवळ आहे, ५०० देतो म्‍हणाला अन्‌ तरुण विवाहितेचा हात धरला!; खामगाव तालुक्‍यातील धक्‍कादायक घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जे तुझ्या नवऱ्याजवळ नाही ते माझ्याजवळ आहे… ५०० रुपये देतो असे म्हणून दीड हजार रुपये दाखवले अन् २९ वर्षीय तरुण विवाहितेचा हात धरून विनयभंग केल्याची घटना खामगाव तालुक्यातील शहापूर शिवारात आज, २७ जुलैला सकाळी अकराच्या सुमारास घडली. विवाहितेने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गावातीलच व्यक्तीविरुद्ध …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जे तुझ्या नवऱ्याजवळ नाही ते माझ्याजवळ आहे… ५०० रुपये देतो असे म्‍हणून दीड हजार रुपये दाखवले अन्‌ २९ वर्षीय तरुण विवाहितेचा हात धरून विनयभंग केल्याची घटना खामगाव तालुक्‍यातील शहापूर शिवारात आज, २७ जुलैला सकाळी अकराच्‍या सुमारास घडली. विवाहितेने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून गावातीलच व्‍यक्‍तीविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला सकाळी शेतात निंदण करत होती. तेव्‍हा सोनाजी रामदास ऊर्फ रामा वाडेकर (रा. शहापूर) हा तिच्‍याकडे आला. तिच्याशी संवाद साधून माझे काम कर. जे तुझ्या नवऱ्याजवळ नाही ते माझ्याजवळ आहे. मी तुला ५०० रुपये देतो असे म्हणून तिला दीड हजार रुपये दाखवले व वाईट उद्देशाने तिचा हात धरला. विवाहिता त्‍याच्‍या हाताला झटका देऊन पळून गावात पळून आली व घरी हा प्रकार सांगितला. घरच्‍यांनी तिला घेऊन पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. तपास एएसआय दीपक इलामे करत आहेत.