झटपट वजन कमी करण्यासाठी रात्री या ३ गोष्टी खा!

वाढत्या वजनामुळे सध्या अनेक जण चिंतित आहेत. अनेक आजारांचा सामना वाढत्या वजनामुळे करावा लागतो. अनेकदा मोठी मेहनत घेऊनही वजन कमी होत नाही. त्यामुळे अनेकांना नैराश्य येते. मात्र वजन कमी करायचे असेल तर घरातल्या सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीही फायदेशीर ठरतात… आरोग्य तज्ञांच्या मते काकडी, मेथी आणि कॅमोमाईल चहा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. या तीन गोष्टींचे …
 
झटपट वजन कमी करण्यासाठी रात्री या ३ गोष्टी खा!

वाढत्या वजनामुळे सध्या अनेक जण चिंतित आहेत. अनेक आजारांचा सामना वाढत्या वजनामुळे करावा लागतो. अनेकदा मोठी मेहनत घेऊनही वजन कमी होत नाही. त्यामुळे अनेकांना नैराश्य येते. मात्र वजन कमी करायचे असेल तर घरातल्या सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीही फायदेशीर ठरतात…

आरोग्य तज्ञांच्या मते काकडी, मेथी आणि कॅमोमाईल चहा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. या तीन गोष्टींचे सेवन केल्याने झटपट लठ्ठपणापासून मुक्त होता येते. दिल्ली येथील प्रसिद्ध आहार तज्‍ज्ञ डॉ. साधना सिंह सांगतात की वजन कमी करण्यासाठी निरोगी आहार आवश्यक आहे. कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश असावा.याशिवाय चांगली आणि शांत झोप सुद्धा महत्त्वाची आहे. कॅमोमाईल चहा शरीरातील ग्लायसीनची पातळी वाढवतो. त्यामुळे पोटात गडबड असेल तर हा चहा फायदेशीर आहे. साखरेची पातळी या चहामुळे नियंत्रित होते. त्यामुळे वजन कमी होण्यास प्रभावी मदत होते.

काकडी आणि ओवा याचा एकत्रित रस घेतल्याने शरीर प्रणाली डिटॉक्स होते. नियमित सेवन केल्याने चरबी जळण्यास मदत होते. काकडीमध्ये खूप कमी कॅलरीज असतात. त्यामुळे प्रभावीपणे वजन कमी होण्यास मदत होते. मेथीच्या पाण्याचे शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे वजन कमी होते. कॅमोमाईल चहा, काकडी, ओव्याचा ज्यूस आणि भिजवलेल्या मेथीच्या दाण्याचे पाणी रात्री झोपण्यापूर्वी अर्ध्या -अर्ध्या तासाच्या अंतराने घेतल्यास महिनाभरात बदल जाणवेल, असे डॉ साधना सिंह सांगतात.