झारखंडचे सरकार पाडण्याच्या प्रयत्नात विदर्भातील नेत्याचा हात?

मुंबई : कर्नाटकमधील धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेसचं सरकार पाडण्यात मुंबई कनेक्शन पुढं आलं होतं. आता झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा त्यात हात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिका यांनी तसा आरोप केला आहे. बिगर भाजपशासित राज्यांतील …
 

मुंबई : कर्नाटकमधील धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेसचं सरकार पाडण्यात मुंबई कनेक्शन पुढं आलं होतं. आता झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा त्यात हात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिका यांनी तसा आरोप केला आहे.

बिगर भाजपशासित राज्यांतील सरकारं उलथवून टाकण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यानंतर राजस्थान, महाराष्ट्र आणि झारखंडसारखी राज्यं भाजपच्या निशाण्यावर आहेत. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार पाडण्यासाठी तेथील आमदारांना भाजपच्या बाजूला वळविलं जात आहे. त्यासाठी बावनकुळे झारखंडला गेले होते. आमदार खरेदीचा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोप मलिक यांनी केला आहे. झारखंड पोलिसांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यात बावनकुळे यांच्यासह भाजप नेते मोहित कंबोज यांचंही नाव आहे. विशेष म्हणजे कर्नाटकात पद सोडावं लागलेले मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्यावरही आमदार खरेदीचा आरोप असून, त्यांची न्यायालयीन चाैकशी सुरू आहे.