झोका बांधल्यावरून वाद; विवाहितेला मारहाण;पतीची पोलिसांत धाव

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नागपंचमी सणानिमित्त झोका खेळण्याची प्रथा आहे. मात्र तारापूर (ता. बुलडाणा) येथे झोका बांधल्याने वाद झाला. यातून विवाहितेला मारहाण झाल्याने ती जखमी झाली. ही घटना काल, १३ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. याप्रकरणी विवाहितेच्या पतीने गावातीलच एकाविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जालमसिंग मंगलसिंग कटवाळ (४०, रा. तारापूर) यांनी दिलेल्या …
 
झोका बांधल्यावरून वाद; विवाहितेला मारहाण;पतीची पोलिसांत धाव

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नागपंचमी सणानिमित्त झोका खेळण्याची प्रथा आहे. मात्र तारापूर (ता. बुलडाणा) येथे झोका बांधल्याने वाद झाला. यातून विवाहितेला मारहाण झाल्याने ती जखमी झाली. ही घटना काल, १३ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. याप्रकरणी विवाहितेच्या पतीने गावातीलच एकाविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

जालमसिंग मंगलसिंग कटवाळ (४०, रा. तारापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी काल सकाळी शेतात काम करत होती. त्यावेळी गावातीलच रामसिंग मंगतसिंग कटवाळ याने त्याच्या मुलांना खेळण्यासाठी जालमसिंग यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला झोका बांधला. त्यावेळी जालमसिंग यांची पत्नी मीताबाई यांनी तू आमच्या शेतात झोका का बांधला, मुलांच्‍या खेळण्याने पिकांचे नुकसान होत आहे. झोका सोडून टाक, असे रामसिंगला म्हणाल्या. त्याचा राग आल्याने रामसिंगने मिताबाईला शिविगाळ व मारहाण केली. बाजेचा ठावा मिताबाईच्या डोक्यावर हाणला. यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. बेशुद्धावस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या तक्रारीवरून रामसिंग मंगतसिंग कटवाळ याच्याविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.