टप्प्याटप्प्याने भरा वीज बिल;शेगावमध्ये कामी आली भाजपची शिष्टाई

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लासुरा गावात (ता.शेगाव) वीज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी 27 फेब्रुवारीला सायंकाळी केलेल्या आडेमुठेपणाचा जाब विचारण्यासाठी आज, 1 मार्चला भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ महावितरण कार्यालयात गेले होते. दांडगाई करण्यापेक्षा ग्राहकांना सवलत द्या. सध्या कोरोना काळ सुरू आहे. मजुरांकडे खायला पैसे नाहीत याची जाणीव ठेवा, असे पदाधिकाऱ्यांनी सुनावल्यानंतर अखेर महावितरणकडून यापुढे …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लासुरा गावात (ता.शेगाव) वीज महावितरणच्‍या कर्मचाऱ्यांनी 27 फेब्रुवारीला सायंकाळी केलेल्या आडेमुठेपणाचा जाब विचारण्यासाठी आज, 1 मार्चला भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ महावितरण कार्यालयात गेले होते. दांडगाई करण्यापेक्षा ग्राहकांना सवलत द्या. सध्या कोरोना काळ सुरू आहे. मजुरांकडे खायला पैसे नाहीत याची जाणीव ठेवा, असे पदाधिकाऱ्यांनी सुनावल्यानंतर अखेर महावितरणकडून यापुढे थेट वीज कापण्यापेक्षा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने बिल भरण्याची परवानगी देण्यात आली आहे.


ज्‍या ग्राहकांनी एप्रिल 2020 पासून वीज बिलाचा भरणा केलेला नाही त्‍यांच्‍यासाठी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने बिल भरण्याची सुविधा देण्यात आली.त्‍यांनी वीज भरणा लवकर करून गैरसोय टाळावी व वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन अभियंता श्री. मोहता यांनी केले. भाजपच्‍या शिष्टमंडळाचे नेतृत्‍व तालुकाध्यक्ष विजय भालतडक यांनी केले.जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख, शेगाव शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, नेते अमित जाधव, शहर चिटणीस मुकिंदा खेळकर व विष्णू शेजोळे यांची उपस्थिती होती.