टाकळीधारवमध्ये 6 महिने वीज चोरून तीन बल्ब, पंखा, टीव्‍ही चालवत होता..!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेले 6 महिने वीजतारेवर आकडा टाकून घरात 3 बल्ब, टीव्ही, पंखा चालवणाऱ्या व्यक्तीच्या घरावर आज, 3 मे रोजी महावितरणच्या पथकाने छापा मारला. आकडा व आकड्यासाठी वापरलेली वायर जप्त करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई टाकळी धारव (ता. शेगाव) येथे करण्यात आली. …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गेले 6 महिने वीजतारेवर आकडा टाकून घरात 3 बल्‍ब, टीव्‍ही, पंखा चालवणाऱ्या व्‍यक्‍तीच्‍या घरावर आज, 3 मे रोजी महावितरणच्‍या पथकाने छापा मारला. आकडा व आकड्यासाठी वापरलेली वायर जप्‍त करण्यात आली आहे. त्‍याच्‍याविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई टाकळी धारव (ता. शेगाव) येथे करण्यात आली.

कनिष्ठ अभियंता संदीप विश्वनाथ ढोले यांच्‍या तक्रारीवरून रामदास शिवराम चव्‍हाण या व्‍यक्‍तीविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. सहायक अभियंता शरद पोतले, वरिष्ठ तंत्रज्ञ व्‍ही. एच. पुरी यांना सोबत घेऊन ढोले यांनी टाकळी धारव गाठून चव्‍हाणचे घर गाठले. तेव्‍हा त्‍याने महावितरण कंपनीच्‍या तारेवर आकडा टाकलेला होता. आकड्याच्या साह्याने वीज चोरून तो घरातील पंखा, बल्ब, टीव्‍ही वापरत होता. त्‍याने एकूण 9560 रुपयांची वीजचोरी केल्‍याचे या वेळी दिसून आले.