टाटा एस वाहनाने वृद्धाला उडवले, चिखलीतील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः टाटा एस चारचाकी वाहनाने उडवल्याने ६५ वर्षीय वृद्ध जखमी झाले. ही घटना चिखली शहरात खामगाव-जालना रोडवरील गणपती मंदिराजवळ काल, २२ जूनच्या सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली. अन्ना डागा आसोलकर (६५, रा. पुंडलिकनगर, चिखली) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. काल सायंकाळी ते बाजारात भाजीपाला आणण्यासाठी गेले असता सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास …
 
टाटा एस वाहनाने वृद्धाला उडवले, चिखलीतील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः टाटा एस चारचाकी वाहनाने उडवल्‍याने ६५ वर्षीय वृद्ध जखमी झाले. ही घटना चिखली शहरात खामगाव-जालना रोडवरील गणपती मंदिराजवळ काल, २२ जूनच्‍या सायंकाळी सव्वा सहाच्‍या सुमारास घडली.

अन्ना डागा आसोलकर (६५, रा. पुंडलिकनगर, चिखली) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. काल सायंकाळी ते बाजारात भाजीपाला आणण्यासाठी गेले असता सायंकाळी सव्वा सहाच्‍या सुमारास गणपती मंदिराजवळील पायऱ्या चढून रस्ता आेलांडत असताना जालन्‍याकडून येणाऱ्या टाटा एस चारचाकी वाहन (क्र MH 28 BB 4106) चालकाने त्याच्‍या ताब्यातील वाहन भरधाव चालवून त्‍यांना जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले. हाताला, मनगटाला, डोक्याला व पायाला मार लागला आहे. त्‍यांच्‍यावर चिखलीतील काळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जखमींचा मुलगा संभाजी आसोलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी टाटा एस वाहनचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.