टिनशेडला विरोध करणाऱ्या महिलेस अश्लील शिविगाळ!, खामगावातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घराच्या भिंतीला लागून सार्वजनिक जागेवर टिनशेड उभारल्याने विरोध करणाऱ्या महिलेला चौघांनी अश्लील शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना खामगाव शहरातील बाळापूर फैल भागात काल, १ ऑगस्टला दुपारी दोनच्या सुमारास घडली.संतोष माहतो (५५), गीता माहतो (५०), विमल माहतो (६७), अनिल माहतो (४५, सर्व रा. बाळापूर फैल खामगाव) अशी आरोपींची …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घराच्‍या भिंतीला लागून सार्वजनिक जागेवर टिनशेड उभारल्‍याने विरोध करणाऱ्या महिलेला चौघांनी अश्लील शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना खामगाव शहरातील बाळापूर फैल भागात काल, १ ऑगस्टला दुपारी दोनच्‍या सुमारास घडली.
संतोष माहतो (५५), गीता माहतो (५०), विमल माहतो (६७), अनिल माहतो (४५, सर्व रा. बाळापूर फैल खामगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्‍यांच्‍याविरोधात सौ. उर्वशी पुरुषोत्तम मारवे (४५, रा. बाळापूर फैल) यांनी तक्रार दिली. तपास पोहेकाँ गजानन जोशी करत आहेत. सौ. उर्वशीच्‍या यांच्‍या घरामागील सार्वजनिक जागेवर त्‍यांच्‍या घराच्‍या भिंतीला लागून आरोपींनी टिनशेड उभे केले. त्‍याला सौ. उर्वशी यांना विरोध केला होता. तपास पोहेकाँ गजानन जोशी करत आहेत.