टिप्परने दुचाकीला उडवले, बापलेकीचा मृत्‍यू; विवाहिता होती सात महिन्यांची गर्भवती!; देऊळगाव शहरातील दुर्दैवी अपघात

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः टिप्परने दिलेल्या धडकेत बापलेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देऊळगाव राजा शहरातील वळण रस्त्यावरील गजानन महाराज मंदिरासमोरील टी पॉईंटजवळ आज, २५ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचच्या घडली. रामप्रसाद चेके (५३, रा. नारायणखेड, ता. देऊळगाव राजा) व सौ. वैशाली गणेश म्हस्के (२२, रा. बोराखेडी) अशी मृतकांची नावे आहेत. रामप्रसाद चेके …
 
टिप्परने दुचाकीला उडवले, बापलेकीचा मृत्‍यू; विवाहिता होती सात महिन्यांची गर्भवती!; देऊळगाव शहरातील दुर्दैवी अपघात

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः टिप्परने दिलेल्या धडकेत बापलेकीचा मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना देऊळगाव राजा शहरातील वळण रस्त्यावरील गजानन महाराज मंदिरासमोरील टी पॉईंटजवळ आज, २५ सप्‍टेंबरला सायंकाळी साडेपाचच्या घडली.

रामप्रसाद चेके (५३, रा. नारायणखेड, ता. देऊळगाव राजा) व सौ. वैशाली गणेश म्हस्के (२२, रा. बोराखेडी) अशी मृतकांची नावे आहेत. रामप्रसाद चेके हे मोटारसायकलीने वैशालीला सासरी बोराखेडी येथे घेऊन येत होते. देऊळगाव राजा शहरातील वळण रस्त्यावर आले असता चिखलीच्या दिशेने जाणाऱ्या टिप्परने त्‍यांना जोरदार धडक दिली. यात वैशालीचा जागीच मृत्यू तर वडील रामप्रसाद चेके यांचा उपचारासाठी जालना येथे नेताना वाटेत मृत्यू झाला.

वैशालीचे एक वर्षापूर्वीच बोराखेडी येथील गणेश म्हस्के या तरुणासोबत विवाह झाला होता. मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्यामुळे वडील रामप्रसाद चेके यांनी चार दिवसांपूर्वी तिला माहेरी नारायणखेड येथे आणले होते. आज सासरी सोडण्यासाठी येत असताना त्‍यांच्‍यावर काळाने घाला घातला. टिप्परचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा पोलीस करत आहेत.