टिप्परने दुचाकीला उडवले; महिला जागीच ठार; नांदुरा शहरातील दुर्घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील जळगाव जामोद मार्गावरील रेल्वेगेटनजीक टिप्परने दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. ही घटना आज, ८ जुलैच्या सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर श्रीराम वेरुळकार (५५, रा. येरळी, ता. नांदुरा) पत्नी मंगलाबाई वेरुळकार (४५) यांच्यासोबत दुचाकीने नांदुऱ्यावरून येरळीकडे जात होते. रेल्वे गेटजवळील गतिरोधकाजवळ …
 
टिप्परने दुचाकीला उडवले; महिला जागीच ठार; नांदुरा शहरातील दुर्घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शहरातील जळगाव जामोद मार्गावरील रेल्वेगेटनजीक टिप्परने दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. ही घटना आज, ८ जुलैच्या सकाळी १०.३० च्‍या सुमारास घडली.

ज्ञानेश्वर श्रीराम वेरुळकार (५५, रा. येरळी, ता. नांदुरा) पत्नी मंगलाबाई वेरुळकार (४५) यांच्यासोबत दुचाकीने नांदुऱ्यावरून येरळीकडे जात होते. रेल्वे गेटजवळील गतिरोधकाजवळ मागून येणाऱ्या टिप्परने (क्रमांक एमएच २८ बीबी ४१७७) त्‍यांना मागून जोरदार धडक दिली. यात मंगलाबाई वेरुळकार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कळताच नांदुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक किशोर घोडेस्वार, ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर, पो. काँ. अमोल राऊत, सुनील गायकवाड यांच्यासह ऋषीकेश इंगळे, विजय वानखडे यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी तात्काळ धाव घेत मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी आणला. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.