टिप्परमध्ये रेती भरत असतानाच आले पोलीस..!; 15 लाखांचे टिप्पर जप्‍त, जलंब पोलिसांची कामगिरी

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैधरित्या वाहतुकीसाठी रेती भरली जात असतानाच जलंब पोलिसांनी छापा मारून टिप्पर जप्त केले. ही कारवाई काल, 26 जूनच्या रात्री 8 च्या सुमारास जलंब पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भोटा शिवारात करण्यात आली. या प्रकरणी पोकाँ संदीप प्रल्हाद गावंडे यांच्या तक्रारीवरून टिप्परचालक मोहन रामदास इंगळे (36, रा. सवर्णा, ता. …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अवैधरित्‍या वाहतुकीसाठी रेती भरली जात असतानाच जलंब पोलिसांनी छापा मारून टिप्पर जप्‍त केले. ही कारवाई काल, 26 जूनच्‍या रात्री 8 च्‍या सुमारास जलंब पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भोटा शिवारात करण्यात आली.

या प्रकरणी पोकाँ संदीप प्रल्हाद गावंडे यांच्‍या तक्रारीवरून टिप्परचालक मोहन रामदास इंगळे (36, रा. सवर्णा, ता. शेगाव) आणि 3 मजुरांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. भोटा शिवारात मोहन इंगळे हा तीन मजुरांच्‍या मदतीने टिप्परमध्ये रेती भरत होता. ही गोपनीय माहिती मिळताच जलंब पोलिसांनी छापा मारला. पिवळ्या रंगाचे टिप्पर (क्र. MH 30 AB 4888, किंमत 15 लाख रुपये) आणि त्‍यातील चार ब्रास रेती (किंमत 25 हजार रुपये) असा एकूण 15 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. तपास पोहेकाँ तुकाराम इंगळे करत आहेत.