टिप्पर मागे घेताना क्लिनरच्‍या अंगावरून गेले, जागीच ठार; मलकापूरजवळील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः टिप्पर मागे घेताना क्लिनरच्या अंगावरून गेले. यात क्लिनर जागीच ठार झाला. ही घटना घिर्णी (ता. मलकापूर) येथील गिट्टी खदानीवर आज, 27 मे रोजी पहाटे पाचच्या सुमारास घडली. अविनाश गजानन गुंजाळ (20, रा. गिरोली ता. देऊळगाव राजा) असे ठार झालेल्या क्लिनरचे नाव आहे. याबाबत खदानीचे मॅनेजर गोपाललाल लक्ष्मीनारायण बाहेती (58) यांनी …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः टिप्पर मागे घेताना क्‍लिनरच्‍या अंगावरून गेले. यात क्‍लिनर जागीच ठार झाला. ही घटना घिर्णी (ता. मलकापूर) येथील गिट्टी खदानीवर आज, 27 मे रोजी पहाटे पाचच्‍या सुमारास घडली.

अविनाश गजानन गुंजाळ (20, रा. गिरोली ता. देऊळगाव राजा) असे ठार झालेल्या क्‍लिनरचे नाव आहे. याबाबत खदानीचे मॅनेजर गोपाललाल लक्ष्मीनारायण बाहेती (58) यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून टिप्परचालक सुमारास श्रीकृष्ण शंकर कुसळकर ऊर्फ बंडू पाटील (34, रा. देवपूर ता. जि. बुलडाणा याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. घिर्णी शिवारात औरंगाबाद येथील दिनेश बाहेती यांची गिट्टी खदान आहे. खदानीवर 4 टिप्पर असून, त्याच्यावर ड्रायव्हर, क्‍लिनर व काम करणारे लोक आहेत. हे लोक गिरोली (ता. देऊळगाव राजा) येथील आहेत.

आज पहाटे पाचच्‍या सुमारास श्रीकृष्ण शंकर कुसळकर ऊर्फ बंडू पाटील (34, रा. देवपूर ता. जि. बुलडाणा) याने फोन करून मॅनेजरला सांगितले, की गिट्टी खदानीवर त्‍याच्‍या ताब्यातील टीप्पर (क्र. MH21 BH 1793) भरून झाल्यावर तो टिप्पर मागे घेत होता. तेव्‍हा त्‍याच्‍यासोबतचा क्लिनर अविनाश गुंजाळ हा मागे उभा राहून साइड सांगत होता. त्‍याचवेळी त्याच्या डोक्यावरून टिप्परचे मागील चाक गेले. त्यामुळे तो तिथून पळून गेल्याचे त्‍याने फोनवर सांगितले. त्‍यामुळे बाहेती यांनी तातडीने तेथे कामावर असलेल्‍या शंकर गुजरला फोन करून माहिती विचारली असता त्याने घटना घडल्‍याचे सांगितले. त्‍यामुळे बाहेती यांनी तातडीने रुग्‍णवाहिका पाठवली. अविनाशला रुग्‍णवाहिकेतून मलकापूरच्‍या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मरण पावल्याचे सांगितले. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. ठाकरे करत आहेत.