टीव्‍हीमुळे दोन कुटुंबात दे दना दन!; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः टीव्हीचा आवाज कमी करा, असे शेजाऱ्याने सांगितल्याने वाद झाला. यातून दोन कुटुंबांत हाणामारी सुरू झाली. ही घटना खातखेड (ता. शेगाव) येथे 21 फेब्रुवारीला घडली. शेगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पूजा जानराव निंबाळकर या महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः टीव्‍हीचा आवाज कमी करा, असे शेजाऱ्याने सांगितल्याने वाद झाला. यातून दोन कुटुंबांत हाणामारी सुरू झाली. ही घटना खातखेड (ता. शेगाव) येथे 21 फेब्रुवारीला घडली. शेगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी परस्‍परविरोधी तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

पूजा जानराव निंबाळकर या महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की शेजारी राहणाऱ्या नंदू गजानन तलवारे यांना टीव्हीचा आवाज कमी करा असे म्हणण्यासाठी त्‍या गेल्‍या होत्‍या. यामुळे नंदूला राग आला. त्‍याने शिविगाळ करत धावून आला. पूजा यांचा मुलगा संतोष यास काठीने मानेवर व उजव्या हातावर मारहाण केली. पूजा आवरण्यासाठी गेली असता तिच्या डोक्यावर काठीने मारले. ज्‍योती तलवारे हिनेही शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून नंदू तलवारे, उमेश गजानन तलवारे, ज्योती नंदू तलवारे यांच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटाने दिलेल्या तक्रारीवरून निंबाळकर कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.