टुनकीच्‍या साई कलेक्‍शनवर कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही टुनकी (ता. संग्रामपूर) फाट्यावरील वसाडी रोडवरील साई कलेक्शन हे कपड्यांचे दुकान सुरू होते. सोनाळा पोलिसांनी दुकानमालक जुगलकिशोर जसराम चांडक (60, रा. टुनकी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरिक्षक श्रीधर गुठ्ठे यांनी या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अत्‍यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही टुनकी (ता. संग्रामपूर) फाट्यावरील वसाडी रोडवरील साई कलेक्‍शन हे कपड्यांचे दुकान सुरू होते. सोनाळा पोलिसांनी दुकानमालक जुगलकिशोर जसराम चांडक (60, रा. टुनकी) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरिक्षक श्रीधर गुठ्ठे यांनी या प्रकरणात तक्रार दिली. 23 मे रोजी श्री. गुठ्ठे हे पोकाँ नीलेश जाधव, पोकाँ मंगेश लेकुरवाळे यांच्‍यासह जीपने सकाळी साडेआठच्‍या सुमारास गस्त घालत होते. तेव्‍हा टुनकी फाट्यावरील साई कलेक्शन सुरू होते. त्‍यात लोकांना कपडे विक्री सुरू होती.