टॉवरवर चढणे अंगलट! शासनाचे नुकसान अन्‌ आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; BSNL च्या अधिकाऱ्यांनी केली तक्रार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल, ९ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या बीएसएनएल टॉवरवर चढून एका व्यक्तीने चांगलाच गोंधळ घातला होता. पोलिसांच्या व प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री पावणेदहाला तो उतरला होता. बायको आणि मुले दारू पिण्याबद्दल वारंवार बोलत असल्याने संतापून आत्महत्या करण्यासाठी टॉवरवर चढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. हा स्टंट मात्र त्याला आता महागात पडला …
 
टॉवरवर चढणे अंगलट! शासनाचे नुकसान अन्‌ आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; BSNL च्या अधिकाऱ्यांनी केली तक्रार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल, ९ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या बीएसएनएल टॉवरवर चढून एका व्यक्तीने चांगलाच गोंधळ घातला होता. पोलिसांच्या व प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री पावणेदहाला तो उतरला होता. बायको आणि मुले दारू पिण्याबद्दल वारंवार बोलत असल्याने संतापून आत्महत्या करण्यासाठी टॉवरवर चढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. हा स्टंट मात्र त्याला आता महागात पडला असून, आज, १० ऑगस्ट रोजी त्याच्याविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी बीएसएनएलचे उपविभागीय अधिकारी संतोष श्रीराम खिल्लारे यांनी तक्रार दिली आहे. काल दुपारी साडेतीनला श्री. खिल्लारे यांना पोलिसांनी फोन केला. कुणीतरी व्यक्ती टॉवरवर चढला आहे. तुमच्या टॉवरवर काम सुरू आहे का, अशी विचारणा पोलिसांनी केली. तेव्हा खिल्लारे यांनी खात्री केली असता टॉवरचे कोणतेही काम सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या व्यक्तीला उतरवण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने बरेच प्रयत्न केले. मात्र यश येत नव्हते. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे त्याचे शूटिंग घेतले असता तो अश्लील हातवारे व शिविगाळ करत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. हा व्यक्ती संजय लक्ष्मण जाधव (रा. मिलिंदनगर बुलडाणा) असल्याचे पोलिसांना तपासात कळले. त्याने टॉवरचे वायर तोडून गळ्यात बांधले. त्यामुळे शासनाचे ७ हजार रुपयांचे नुकसान झाले, असे तक्रारीत म्‍हटले आहे.