ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन नवविवाहिता जागीच ठार; सासू-सासरे जखमी, चिखली तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रक आणि ऑटोच्या भीषण अपघातात नवविवाहिता जागीच ठार तर सासू- सासरे जखमी झाले. ही घटना आज, ९ जुलैला दुपारी साडेतीनच्या सुमारास चिखली- खामगाव रोडवरील बोरगाव वसू गावाजवळ घडली. शीतल मंगेश होगे (२०, रा. दहिगाव ता. चिखली) असे ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सासरे भास्कर होगे (५५) आणि सासू लता होगे(५०) …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रक आणि ऑटोच्या भीषण अपघातात नवविवाहिता जागीच ठार तर सासू- सासरे जखमी झाले. ही घटना आज, ९ जुलैला दुपारी साडेतीनच्या सुमारास चिखली- खामगाव रोडवरील बोरगाव वसू गावाजवळ घडली. शीतल मंगेश होगे (२०, रा. दहिगाव ता. चिखली) असे ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सासरे भास्कर होगे (५५) आणि सासू लता होगे(५०) जखमी झाले आहेत.

तिघेही दहिगाव येथील ऑटोतच (क्र. एमएच २८ एच ४७२३) चिखलीवरून दहिगावकडे चालले होते. बोरगाव वसू गावाजवळ ट्रकला (क्र. एमएल ०१, एडी ११८७) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकचा धक्का ऑटोला लागला. त्यामुळे ऑटोत बससलेल्या शीतल होगे बाहेर पडून ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सासू आणि सासरे जखमी झाले. त्यांच्यावर चिखली येथे उपचार सुरू आहेत. गेल्या २८ मे रोजी हराळखेड (ता. चिखली) येथील स्व. अनंता मावळे यांची कन्या शीतलचा विवाह दहिगाव येथील भास्कर होगे यांचे चिरंजीव मंगेश होगे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या सव्वा महिन्यातच विवाहितेचा मृत्यू झाल्याने दहिगाव व हराळखेड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.